मराठी सिनेसृष्टीतील सदाबहार कलाकाराची जोडी म्हणून अशोक सराफ आणि निवेदिता जोशी सराफ यांच्याकडे पाहिले जाते. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी गेली अनेक दशकं आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. त्याबरोबरच निवेदिता सराफ या देखील उत्तम अभिनेत्री आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही सराफ कुटुंबियांनी मोठ्या थाटात दिवाळी साजरी केली. त्याचा एक व्हिडीओ निवेदिता सराफ यांनी पोस्ट केला आहे.

दिवाळी म्हणजे रोषणाई, अभ्यंगस्नान, लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज, फटाक्यांची आतषबाजी आणि स्वादिष्ट फराळाची मेजवानी. निवेदिता सराफ यांनी नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी सराफ कुटुंबियांच्या फराळाची मेजवानी दाखवली आहे.
आणखी वाचा : निवेदिता सराफ यांना शॉपिंग करताना स्टोअरमध्ये आला वाईट अनुभव, पोस्ट शेअर करत म्हणाल्या…

यात निवेदिता सराफ या अशोक सराफ यांना फराळाची चव चाखण्यास सांगत आहेत. अशोक सराफही चकली आणि खाजाचे कानवले खाऊन ते कसे झालेत हे सांगतात. त्यावेळी तेही मजा मस्ती करतानाही पाहायला मिळत आहेत. यानंतर ते सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या शुभेच्छा देतानाही दिसत आहेत.

आणखी वाचा : निवेदिता सराफ यांचे वय किती? स्वत:च खुलासा करत म्हणाल्या, “मला लाज…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान निवेदिता सराफ यांच्या या व्हिडीओवर प्राजक्ता माळी, सुपर्णा श्याम या दोघींनी कमेंट केली आहे. यावर प्राजक्ताने हार्ट इमोजी शेअर केला आहे. “काय सुंदर व्हिडीओ आहे, शुभ दिपावली”, अशी कमेंट सुपर्णाने केली आहे.