marathi actress pallavi patil travel with auto driver post goes viral | Loksatta

रिक्षा चालकाच्या बाजूला बसून मराठमोळ्या अभिनेत्रीचा प्रवास; पोस्ट शेअर करत म्हणाली “आपली चौकट…”

मराठी अभिनेत्रीने रिक्षातून केला प्रवास, पोस्टने वेधलं लक्ष

रिक्षा चालकाच्या बाजूला बसून मराठमोळ्या अभिनेत्रीचा प्रवास; पोस्ट शेअर करत म्हणाली “आपली चौकट…”
पल्लवी पाटीलची इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत. (फोटो: पल्लवी पाटील/ इन्स्टाग्राम)

पल्लवी पाटील ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. पल्लवीने अल्पावधीतच कलाविश्वात तिची वेगळी ओळख निर्माण केली. तिने मालिका व चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. नुकताच पल्लवीला एक बॉलिवूड चित्रपटही मिळाला आहे.

पल्लवी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. फोटो,व्हिडीओ तसेच कामाबद्दलही माहिती शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. पल्लवीने नुकतंच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला आहे. रिक्षात बसल्याचा हा फोटो असून यावर तिने पोस्टही लिहिली आहे. फोटोमध्ये दिसत असल्याप्रमाणेच पल्लवीने रिक्षा चालकाच्या बाजूला बसून प्रवास केला आहे. तिच्या या फोटोने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा>> Video: व्हॅनिटी वॅनमधून उतरताच चाहत्यांनी केली तुफान गर्दी अन्…; ‘जीव माझा गुंतला’ फेम अभिनेत्रीने शेअर केला अनुभव

“मला नेहमीच रिक्षा चालकांच्या बाजूला बसून प्रवास करायचा होता. त्याबरोबरच ते गाव पहायचं होतं. त्यांच्या घरी कोण कोण असतं पासून त्यांना खरंच मज्जा येते का हे काम करताना असे सगळे प्रश्न…आपण कधीच बाजूला बसू शकत नाही. पहिलं ही नव्हतं. मुली बसत नाहीत!! आपली चौकट नकळत आपण निर्माण करतो. माझी चौकट मी मोडली ह्याचा खूप आनंद झाला आणि समाधान देऊन गेलं. तुम्ही पण करून पाहा… मज्जा येते” असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

हेही पाहा>> Photos: आलिया-रणबीर ते राणादा-पाठकबाई, २०२२ मध्ये कलाविश्वातील ‘या’ लोकप्रिय जोड्यांनी बांधली लग्नगाठ

हेही वाचा >> लग्नानंतर रात्रीच राणादा पाठकबाईंना कॉफी डेटला घेऊन गेला अन्…; फोटो व्हायरल

पल्लवीची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे. यावर अनेकांनी प्रतिक्रिया देत कमेंट केल्या आहेत. पल्लवीचं कौतुक करताना चाहते दिसत आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा ( Marathi-cinema ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-12-2022 at 19:14 IST
Next Story
“अन्ना रासकला…”  मराठमोळ्या संतोष जुवेकरला मिळाली दाक्षिणात्य जाहिरात, व्हिडीओ पाहिलात का?