‘कलरफुल’ अभिनेत्री अशी ओळख असणारी पूजा सावंत लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. काल, १६ फेब्रुवारीला पूजाचा सिद्धेश चव्हाण याच्याशी साखरपुडा झाला. पारंपरिक पद्धतीने पूजा व सिद्धेशचा साखरपुडा पार पडला. याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पण पूजाने स्वतः साखरपुड्याची अधिकृत घोषणा केली नव्हती. त्यामुळे पूजाचे चाहते याची आतुरतेने वाट पाहत होते.

अखेर अभिनेत्री पूजा सावंतने नुकतीच सोशल मीडियावर साखरपुड्याची अधिकृत घोषणा केली आहे. साखरपुड्यातील खास क्षणाचे फोटो शेअर करत तिने साखरपुडा झाल्याचं जाहीर केलं आहे. ‘धागा धागा’ हे स्वतःचं गाणं अभिनेत्रीने साखरपुड्याच्या फोटोमागे लावलं आहे. या फोटोंमध्ये पूजा व सिद्धेशचा चेहऱ्यावरचा आनंद पाहायला मिळत आहे.

हेही वाचा – Video: लग्नाआधी रकुल प्रीत सिंग व जॅकी भगनानी सिद्धिविनायकाच्या चरणी, व्हिडीओ व्हायरल

साखरपुड्यात सुरुवातीला पूजा व सिद्धेशने पारंपरिक लूक केला होता. पूजाने सोनरी किनार असलेली हिरव्या रंगाची साडी नेसली होती. तर सिद्धेशने ऑफ व्हाईट रंगाचा कुर्ता-पायजमा घातला होता. त्यानंतर अंगठी घालताना दोघं पांढऱ्या रंगाच्या पेहरावात दिसले.

पूजाने शेअर केलेल्या या पोस्टवर कलाकार मंडळींसह चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. सुरुची अडारकर, चित्राली गुप्ते, सलील कुलकर्णी, विशाल निकम, फुलवा खामकर, आशिष पाटील, सुखदा खांडकेकर, निखिल बने, अमितराज अशा अनेक कलाकार मंडळींनी पूजा व सिद्धेशला शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा – Video: ‘आता होऊ दे धिंगाणा २’ घेणार प्रेक्षकांचा निरोप! अंकुश चौधरीचा नवा रिअ‍ॅलिटी शो येणार भेटीस, पहिला प्रोमो आला समोर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आता पूजा व सिद्धेश कधी लग्न करणार? हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. पण मेहंदी, हळद, संगीत, सप्तपदी असा समारंभपूर्वक लग्नसोहळा पूजाचा होणार आहे. संगीताची तयारी जोरदार सुरू असल्याची माहिती पूजाचा चांगला मित्र वैभव तत्ववादीने दिली.