दिवाळीच्या मुहूर्तावर तीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आले होते. दोन बिग बजेट हिंदी तर एक मराठी ऐतिहासिक चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला. अक्षय कुमारचा ‘राम सेतू’, अजय देवगणचा ‘थँक गॉड’ तर सुबोध भावेचा ‘हर हर महादेव’ बॉक्स ऑफिसवर दाखल झाला आहे. दोन हिंदी चित्रपटांना टक्कर एका मराठी चित्रपटाने दिली आहे. या चित्रपटाचे बॉक्स ऑफिसचे आकडे समोर आले आहेत.
‘हर हर महादेव’ चित्रपटातील अभिनेता शरद केळकर याने पहिल्या दिवशी चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवरची कमाईचे आकडे सांगितले आहेत. आपल्या इन्टाग्राम अकाऊंटवर त्याने ही माहिती दिली आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाने २.२५ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाचे सध्या सगळे कौतुक करत आहेत. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी चित्रपटाचे कौतूक केले आहे ते असं म्हणाले हा चित्रपट पाहून मला रडायला आले. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे हा चित्रपट मराठी व्यतिरिक्त इतर पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.
तापसी पन्नू व फोटोग्राफर यांच्यामध्ये पुन्हा एकदा वाद, नेटकरी म्हणाले, “जया बच्चन…”
या चित्रपटाच्या निमित्ताने सुबोध भावे यांनी दाक्षिणात्य अभिनेते नागार्जुन यांची भेट घेतली होती. यावेळी नागार्जुन यांच्या हस्ते तेलुगू चित्रपटातील पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. महाराष्ट्राचे आद्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय इतिहासातील अनन्य साधारण व्यक्तिमत्व असलेल्या बाजीप्रभूंवर हा चित्रपट चित्रित करण्यात आला आहे.
‘हर हर महादेव’ या चित्रपटाचे लेखन दिग्दर्शन अभिजीत देशपांडे यांनी केले आहे. या चित्रपटात सुबोध भावे, शरद केळकर, अमृता खानविलकर, सायली संजीव, निशिगंधा वाड, अशोक शिंदे, मिलिंद शिंदे, हार्दिक जोशी, किशोर कदम, शरद पोंक्षे हे कलाकार झळकणार आहेत. येत्या दिवाळीत म्हणजे २५ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.