रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख यांच्या ‘वेड’ या चित्रपटाने खरोखरच प्रेक्षकांना वेड लावलं आहे. ३० डिसेंबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच या चित्रपटाची सर्वत्र चर्चा होती. तर या चित्रपट प्रदर्शित झाल्यावर प्रेक्षकांनी या चित्रपटाला डोक्यावर घेतलेलं आहे. या चित्रपटातील कलाकारांचा अभिनय चित्रपटाची कथा चित्रपटातील गाणी हे सर्वच प्रेक्षकांना आवडलं आहे. अनेकांनी या चित्रपटातील गाण्यांवर व्हिडीओ बनवले आहेत. फक्त चाहतेच नाही तर यात कलाकारांचाही समावेश आहे. आता ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील परी म्हणजेच सर्वांची लाडकी मायरा वायकुळ हिने ‘वेड लावलंय’ या गाण्यावर ताल धरला आहे.

‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतून मायराने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं आणि सर्वांची शाबासकी मिळवली. तिचा निरागसपणा प्रेक्षकांना भावला. तिचे आई-वडील सोशल मीडियावरून मायराबद्दल अनेक गोष्टी चाहत्यांची शेअर करत असतात. लवकरच ‘माझी तुझी रेशीमगाठी’ मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. नुकतंच या मालिकेच्या शेवटच्या भागाचं चित्रीकरण पूर्ण झालं. अशातच रितेश देशमुख आणि सलमान खान यांच्यावर चित्रीत झालेल्या ‘वेड’ चित्रपटातील ‘वेड लावलंय’ या गाण्याने मायराला वेड लावलं आहे. त्या गाण्यावर आता तिने एक जबरदस्त डान्स केला.

आणखी वाचा : तिसऱ्या वीकेण्डला ‘वेड’ची दमदार कामगिरी, सुरु केली ५० कोटींकडे वाटचाल

मायराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल होत आहे. यावेळी होती तिच्या आईबरोबर दिसत असून त्या दोघी रितेश देशमुखच्या ‘वेड लावलंय’ या गाण्यावर थिरकल्या. यावेळी काळ्या रंगाचा फ्रॉक घातलेल्या मायराने त्या गाण्यावर नाच करणं खूप एन्जॉय केलं. हा व्हिडिओ शेअर करताना तिने लिहिलं, “मम्मीला पण वेड लागलं या गाण्याचं.” आता त्या दोघींचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. व्हिडीओवर कमेंट करत मायराच्या चाहत्यांनी त्यांचा हा डान्स आवडल्याचं सांगत त्यांचं कौतुक केलं आहे.

हेही वाचा : Video: रोड ट्रिपदरम्यान अचानक गाडीवर माकडं चढली अन्…; पुढे परीने काय केलं ते एकदा पाहाच, व्हिडीओ व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान रितेश आणि जिनिलीया यांच्या ‘वेड’ या चित्रपटाला सर्वत्र तुफान प्रतिसाद मिळत आहे. परवापर्यंत या चित्रपटाने 47.92 कोटींचा गल्ला जमवला होता. तर आता लवकरच हा चित्रपट 50 कोटींच्या क्लबमध्ये पोहोचणार आहे.