‘बिग बॉस मराठी’मधून बाहेर पडल्यानंतर लावणीसम्राज्ञी मेघा घाडगे चर्चेत आहे. मेघा घाडगे सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. आज महापरिनिर्वाण दिनी तिने खास व्हिडीओ शेअर केला आहे.

मेघाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो शेअर करत त्यांना अभिवादन केलं आहे. याबरोबरच तिने डान्सचा एक जुना व्हिडीओही महापरिनिर्वाण दिनाचं औचित्य साधत शेअर केला आहे. “भीमराज की बेटी” या गाण्यावर डान्स करतानाचा मेघाचा हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ शेअर करत मेघाने अनोखी मानवंदना दिली आहे.

हेही वाचा>> राणादा-पाठकबाईंच्या रिसेप्शन सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोन आला अन्…; हार्दिक-अक्षयाच्या लग्नातील व्हिडीओ व्हायरल

हेही वाचा>> महापरिनिर्वाण दिनी गौरव मोरेची खास पोस्ट, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो शेअर करत म्हणाला…

६ डिसेंबर हा दिवस ‘महापरिनिर्वाण दिन’ म्हणून साजरा केला जातो. मेघा घाडगेने यादिवशी शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं आहे.

हेही वाचा>>Video: “अंघोळ घालतेय राखी सावंत…” ड्रामा क्वीनने फ्लर्ट केल्यानंतर जागा झाला प्रसाद जवादेमधील रॅपर; घरातील सदस्यांनाही हसू अनावर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मेघा घाडगे लोकप्रिय लावणीसम्राज्ञी आहे. आपल्या ठसकेबाज लावणीने ती चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवत असते. ‘बिग बॉस’च्या घरातही तिला चाहत्यांनी पसंती दर्शविली होती.