सध्या भारतात भाजपाप्रणित मोदी सरकार आहे. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत बहुमतांनी विजय मिळवत भाजपाने सत्ता स्थापन केली. त्यानंतर २०१९च्या निवडणुकीतही त्यांना बहुमत मिळालं. २०१४ साली बहुमत मिळवत सत्तेत आलेल्या मोदी सरकारला मंगळवारी(३० मे) ९ वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट केलं आहे.

“आज आम्हाला नऊ वर्ष पूर्ण झाली. या काळात आम्ही देशाची सेवा केली. मी विनम्रता आणि कृतज्ञता व्यक्त करतो. प्रत्येक निर्णय, कृती ही देशातील नागरिकांचे आयुष्य सुधारण्याच्या दृष्टीने घेतलेला होता. देशाला विकसित बनवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू राहतील,” असं पंतप्रधान मोदींनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा>> “एका बलात्काऱ्याला…”, पदके गंगेत विसर्जित करण्याच्या कुस्तीपटूंच्या निर्णयानंतर स्वरा भास्करचं ट्वीट, म्हणाली…

नरेंद्र मोदींचं हे ट्वीट प्रसिद्ध मराठी अभिनेता आरोह वेलणकरने रिट्वीट केलं आहे. मोदी सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाल्याने आरोहने अभिनंदन केलं आहे. “तुमच्यासारखे पंतप्रधान लाभल्याने आम्ही भारतीय भाग्यवान आहोत,” असं आरोहने ट्वीटमध्ये म्हटलं आहे. आरोहचं हे ट्वीट सध्या चर्चेत आहे.

हेही वाचा>> केके यांचं शेवटचं मराठी गाणं प्रदर्शित; ‘अंब्रेला’ चित्रपटातील गाण्याला तुफान प्रतिसाद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोह वेलणकर मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने आजवर अनेक मालिका व चित्रपटांत काम केले आहे. ‘रेगे’ या चित्रपटातील त्याची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उरतली होती.