अभिनेत्री शिवानी रांगोळे आणि विराजस कुलकर्णी हे मराठी मनोरंजन सृष्टीतील एक लोकप्रिय जोडपं. यावर्षी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर त्यांनी लग्नगाठ बांधली. गेली अनेक वर्ष शिवानी आणि विराजस यांची मैत्री असल्याने विराजसच्या कुटुंबियांशीही शिवानीचे लग्नाआधीच खूप छान बॉण्डिंग तयार झाले. शिवानी ही मृणाल कुलकर्णी यांची अत्यंत लाडकी आहे. अनेकदा त्या समारंभांना एकत्र हजेरी लावताना दिसतात. त्याचप्रमाणे शिवानीच्या कामाचंही मृणाल भरभरून कौतुक करताना दिसतात. आता त्यांनी शिवानीसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

शिवानी रांगोळे हिने काही दिवसांपूर्वीच तिचा कवितासंग्रह प्रकाशित केला. हा तिचा पहिलाच कवितासंग्रह आहे. ‘रेन्स कॉफी अँड टुमॉरो’ असं या पुस्तकाचं नाव आहे. सप्टेंबर २०२२ मध्ये हा कवितासंग्रह सर्वांसाठी उपलब्ध झाला. पण आता हा कवितासंग्रह रसिकांना ॲमेझॉन, फ्लिपकार्टसारख्या साइटवरूनही विकत घेता येणार आहे.

आणखी वाचा : “आता पूर्णविराम देण्याची वेळ आलीये…” म्हणणाऱ्या सुव्रत जोशीचे पत्नी सखी गोखलेने मानले आभार, म्हणाली…

याच निमित्त मृणाल कुलकर्णी यांनी शिवानीने पोस्ट केलेला एक फोटो शेअर केला. त्यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये शिवानीच्या हातात तिचा कवितासंग्रह दिसत आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी लिहिलं, ” शिवानीचं पहिलं पुस्तक…!” त्यांनी शेअर केलेला या पोस्टमधून त्यांना आपल्या सूनेबद्दल किती कौतुक आणि प्रेम वाटतं हे पुन्हा एकदा समोर आलं आहे. या पोस्टवर त्यांचे चाहते कमेंट्स करत शिवानीला शुभेच्छा देत आहेत.

हेही वाचा : “प्रिय शिवानी, तू आल्यापासून जाणवतंय…”; मृणाल कुलकर्णींची सूनबाईंच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मृणाल कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे लवकरच एका चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाचं नाव ‘फक्त महिलांसाठी’ असं आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने मृणाल कुलकर्णी जवळपास ८ वर्षांनी दिग्दर्शिका म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.