Mrinal Kulkarni : आपल्या सहज सुंदर अभिनयाने कायमच रसिक प्रेक्षकांना भुरळ घालणाऱ्या अभिनेत्रींमध्ये मृणाल कुलकर्णी यांचं नाव घेतलं जातं. त्यांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. आजवर अनेक मालिका, चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. ‘सोनपरी’ या मालिकेमुळे त्यांना विशेष लोकप्रियता मिळाली. आजही बहुतांश लोक मृणाल कुलकर्णींना ‘सोनपरी’ म्हणून ओळखतात.

दमदार अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत स्वत:चं वेगळं अस्तित्व निर्माण करणाऱ्या मृणाल कुलकर्णींनी वैयक्तिक आयुष्यात १० जून १९९० रोजी रुचिर कुलकर्णी यांच्याशी लग्नगाठ बांधली. मृणाल कुलकर्णी सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. आज पती पती रुचिर कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली आहे.

नवऱ्याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना मृणाल कुलकर्णी लिहितात, “आमचं कुटुंब एकमेकांशी घट्ट जोडलेलं आणि रुचिर त्याचा एक अविभाज्य भाग… अगदी फार फार वर्षापासून… किस्से सांगून आम्हा सर्वांना खळखळून हसवणारा, धमाल खोड्या करणारा, आरडाओरडा करुन हक्काने कौतुक वसूल करणारा, अतिशय मनापासून दाद देणारा आणि क्षणात गंभीर होऊन अगदी योग्य असा सल्ला देणारा! आईच्या आजारपणात ‘थोरला’ बनून त्याने आम्हा सर्वांना आधार दिला. तेव्हा त्याचं एक वेगळंच रुप जाणवलं. अनेक वर्षे एकत्र असलो तरी आपण एकमेकांना सतत नव्याने उमगत असतो हेच खरं! रुचिर, तू असा हात घट्ट धरला आहेस, हे फार फार सुखाचं आहे. तुला जन्मदिनाच्या अनेकानेक शुभेच्छा!”

mrinal kulkarni
मृणाल कुलकर्णी यांनी नवऱ्याच्या वाढदिवसानिमित्त लिहिली सुंदर पोस्ट ( mrinal kulkarni )

अभिनेत्रीच्या पोस्टवर मराठी कलाविश्वातील सेलिब्रिटींनी तसेच त्यांच्या चाहत्यांनी रुचिर कुलकर्णी यांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Mrinal Kulkarni (@mrinalmrinal2)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी मृणाल यांना त्यांच्या घरच्यांचा खूप मोठा पाठिंबा मिळाला. वयाच्या पन्नाशी ओलांडूनही त्या कायम फिट दिसतात. त्यांचा लेक विराजस कुलकर्णी अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे. ‘माझा होशील ना’ या गाजलेल्या मालिकेत त्याने मध्यवर्ती भूमिका साकारली होती. तर, मृणाल कुलकर्णींची सून शिवानी रांगोळे सध्या ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत अक्षरा हे प्रमुख भूमिका साकारत आहे.