scorecardresearch

Premium

मृण्मयी देशपांडेच्या संसाराला ७ वर्षे पूर्ण! नवऱ्याबरोबर लिपलॉक करतानाचा फोटो शेअर करत म्हणाली…

मृण्मयी देशपांडेने मुंबई सोडून नवऱ्यासह महाबळेश्वरमध्ये थाटला संसार, लग्नाच्या वाढदिवसाला शेअर केला लिपलॉक करतानाचा रोमँटिक फोटो

mrunmayee deshpande 7th marriage anniversary
लग्नाच्या वाढदिवसाला मृण्मयी देशपांडेचा रोमँटिक अंदाज

‘अग्निहोत्र’, ‘कुंकू’ या छोट्या पडद्यावरील मालिकांमुळे अभिनेत्री मृण्मयी देशपांडे घराघरांत लोकप्रिय झाली. मालिका, चित्रपट, वेबसीरिज अशा तिन्ही माध्यमांमध्ये तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सिनेसृष्टीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केल्यावर ३ डिसेंबर २०१६ रोजी मृण्मयीने व्यावसायिक स्वप्नील रावशी लग्नगाठ बांधली. आज त्यांच्या लग्नाला ७ वर्षे पूर्ण झाली आहेत.

लग्नाच्या वाढदिवसानिमित्त मृण्मयीने रोमँटिक पोस्ट शेअर करत नवऱ्याला शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोमध्ये मृण्मयी आणि स्वप्नील एकमेकांना लिपकिस करताना दिसत आहेत. अभिनेत्रीने या फोटोला “७ वर्षे पूर्ण, आय लव्ह यू राव” असं कॅप्शन दिलं आहे.

Clash of women in two villages over Ichalkaranji tap water scheme
इचलकरंजी नळपाणी योजनेवरून दोन गावातील महिलांचा असाही संघर्ष; ‘आम्ही सावित्रीच्या लेकी’ नंतर ‘आम्ही जिजाऊच्या लेकीं’चे सोमवारपासून प्रतिआंदोलन
love triangle nagpur
‘पती, पत्नी और वो…’ प्रेमाच्या त्रिकोणातून दोन संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर; भरोसा सेलने…
kalyan crime news, kalyan attack on driver marathi news
पैसे दिले नाही म्हणून कल्याणमध्ये चालकावर हल्ला
sangli crime news, arwade high school sangli, boy attacked on his friend with koyta sangli
सांगली : चिडवल्याच्या कारणाने वर्गमित्रावर शाळेत कोयत्याने हल्ला

हेही वाचा : Video : ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीच्या लेकाचं बारसं थाटामाटात पडलं पार, नाव ठेवलंय खूपच खास…

मृण्मयी आणि स्वप्नीलच्या या रोमँटिक फोटोवर सध्या सिनेविश्वातील कलाकार आणि अभिनेत्रीचे चाहते कौतुकाचा वर्षाव करत आहेत. पूजा सावंत, अभिजीत खांडकेकर, अमृता खानविलकर, सलील कुलकर्णी, आनंदी जोशी या कलाकारांनी अभिनेत्रीच्या पोस्टवर कमेंट करत तिला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा : “सेटवर स्वच्छतागृह नव्हती अशावेळी झाडामागे…”, दिया मिर्झाने सांगितला इंडस्ट्रीत आलेला अनुभव, म्हणाली…

दरम्यान, मृण्मयी देशपांडेने सध्या मुंबईपासून दूर महाबळेश्वरमध्ये तिचा संसार थाटला आहे. याठिकाणी मृण्मयी-स्वप्नीलने ‘नील अँड मोमो’ फार्म्स हा नवा व्यवसाय सुरू केला आहे. महाबळेश्वरच्या निसर्गरम्य वातावरणातील अनेक फोटो व व्हिडीओ अभिनेत्री सोशल मीडियावर शेअर करत असते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mrunmayee deshpande 7th marriage anniversary actress shares romantic post for her husband sva 00

First published on: 03-12-2023 at 11:19 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×