अभिनेत्री नम्रता संभेरावने मालिकाविश्वातून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. गेल्या काही वर्षांत तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे ती घराघरांत लोकप्रिय झाली. अभिनय क्षेत्रात जम बसवल्यावर वैयक्तिक आयुष्यात तिने योगेश यांच्याशी २०१३ मध्ये लग्नगाठ बांधली.

नम्रता आणि योगेश यांना रुद्राज नावाचा गोड मुलगा आहे. लग्नानंतर सुद्धा तिने आपलं काम सुरू ठेवलं. या सगळ्यात नम्रताला तिच्या सासरच्या लोकांनी खूप पाठिंबा दिला. याबद्दल नुकत्याच राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने खुलासा केला आहे.

हेही वाचा : अखेर लग्नानंतर ऑस्ट्रेलियाला गेलेली पूजा सावंत दीड महिन्यांनी मुंबईत परतली; बहीण रुचिरा पोस्ट शेअर करत म्हणाली…

नम्रता म्हणाली, “२०११-२०१२ च्या ‘लज्जा’ मालिकेपासून माझ्या कामाची सुरुवात झाली ते आज २०२४ पर्यंत…मी नेहमीच चांगलं काम करण्यासाठी प्रयत्न करत असते. देवाच्या कृपेने सगळं व्यवस्थित चालू आहे. मध्यंतरी गरोदरपणात मी जवळपास पाच ते सहा महिने घरी होते. पण, तो काळ मी आनंदात घालवला. मी माझ्या लेकाबरोबर सुद्धा खूप एन्जॉय केलं. माझ्या एकंदर २० वर्षांच्या करिअरमध्ये मला कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची साथ मिळाली.”

अभिनेत्री पुढे म्हणाली, “माझ्या मम्मी-पप्पांपासून, भाऊ-बहीण ते आज रुद्राजपर्यंत सर्वांनी मला पाठिंबा दिला. माझा नवरा योगेश, सासू-सासरे या सगळ्यांनीच मला पाठिंबा दिला. मला आजवर लग्न झाल्यानंतर असं काही वेगळं नाही वाटलं. आता बाळाचं बघा, आता तू काम नको करूस असं कधीच मला कोणीही सांगितलं नाही.”

हेही वाचा : “अपून तो हिरो बनगया!”, सलूनच्या बाहेर स्वत:चा फोटो पाहून संतोष जुवेकर म्हणाला, “शाहरुख, सलमान खान…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मला सासऱ्यांनी फक्त एकच गोष्ट सांगितली होती ती म्हणजे, असं काम कर जे आम्ही चारचौघात बसून बघू शकतो. माझं अगदी तसंच काम चालू आहे. मी नेहमीच प्रेक्षकांसाठी काम करते. कारण, त्यांना माझं काम आवडलं तरच मी आयुष्यभर या क्षेत्रात काम करू शकते. त्यामुळे सासऱ्यांनी सांगितलेली ती गोष्ट मी आजवर पाळतेय. त्यांना मी कधीच नाराज करणार नाही. त्यांनी मला एवढा छान पाठिंबा दिलाय. ते माझ्या कामाचा आदर करतात आणि आता रुद्राज पण मला खूप समजून घेतो.” असं नम्रता संभेरावने सांगितलं.