‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामधून अभिनेत्री नम्रता संभेराव हिला एक वेगळी ओळख मिळाली. आज तिच्या विनोदी शैलीचे लाखो चाहते आहेत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमामध्ये नम्रता साकारत असलेलं प्रत्येक पात्र प्रेक्षकांना खळखळून हसवतं. आता ती एका चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सध्या परेश मोकाशी दिग्दर्शित ‘वाळवी’ या चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. या चित्रपटाचा ट्रेलरही नुकताच प्रदर्शित झाला. स्वप्निल जोशी, सोबत भावे, अनिता दाते आणि शिवानी सुर्वे यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. यांच्याबरोबरच आता अभिनेत्री नम्रता संभेरावदेखील या चित्रपटात एका हटके भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातील तिचा प्रोमो नुकताच आऊट झाला. यातही नम्रताचा विनोदी अंदाज पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा : Video: …अन् सारा अली खान रितेश देशमुखशी चक्क मराठीत भांडू लागली, व्हिडीओ व्हायरल

नम्रताने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर या चित्रपटातील तिचा प्रोमो शेअर केला. या प्रोमोमध्ये ती तिच्या सासूला डेंटिस्टकडे घेऊन आलेली दिसतेय. तर सासूच्या दातातून रक्त येत असल्याने ती डेंटिस्टला उपचार करण्यासाठी घाई करत आहे. तिच्या गडबडबडीमुळे डेंटिस्टही तिच्यावर वैतागल्याचं या प्रोमोमध्ये दिसत आहे. डेंटिस्टकडून घरी गेल्यावर या थर्टी फर्स्टच्या पार्टीला जायचं असल्याचं ती सगळ्यांना सांगतेय. तर आतमध्ये तिची सासू डेंटिस्टला ही बाई भयानक आहे असं म्हणत आहे.

हेही वाचा : “गरोदरपणात सात महिन्यांपर्यंत…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेराव स्वतःच्याच सासूबाईंबाबत काय म्हणाली?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नम्रताने हा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करतात तिचा हा अंदाज नेटकऱ्यांना चांगलाच आवडलेला दिसत आहे. तिच्या या व्हिडिओवर तिचे चाहते भरभरून कमेंट्स करत तिचं कौतुक करत आहेत, तसंच तिला या चित्रपटासाठी शुभेच्छा देत आहेत. हा चित्रपट 13 जानेवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.