मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी गेल्या काही दिवसांत अभिनय क्षेत्र सांभाळून स्वत:चे व्यवसाय सुरू केले आहेत. मेघा धाडे, महेश मांजरेकर, सुप्रिया पाठारे, हार्दिक जोशी, प्रार्थना बेहेरे, प्राजक्ता माळी यांसारख्या बऱ्याच कलाकारांनी गेल्या काही दिवसांत हॉटेल, फार्महाऊस, कपडे व इतर व्यवसायांमध्ये आपला जम बसवला आहे. या यादीत आता आणखी एका ज्येष्ठ अभिनेत्याचं नाव जोडलं गेलं आहे.

‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणारे अभिनेते प्रदीप कबरे यांनी मुंबईपासून हाकेच्या अंतरावर ‘होमस्टे फार्महाऊस’ सुरू केलं आहे. यासंदर्भात पोस्ट शेअर करून त्यांनी माहिती दिली आहे.

अभिनेते प्रदीप कबरे यांचं हे फार्महाऊस मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या मनोरी परिसरात आहे. हे फार्महाऊस आता त्यांनी सर्वसामान्य नागरिकांसाठीही ( फक्त कुटुंबीय व मोठे ग्रुप्स ) खुलं केलं आहे. प्रदीप यांनी नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टमध्ये चुलीवरचं जेवण, प्रशस्त जागा, स्विमिंग पूल, हिरवीगार झाडी या गोष्टी पाहायला मिळत आहेत.

हेही वाचा : ‘लागीरं झालं जी’ फेम अभिनेत्रीच्या जुळ्या मुलींची कलाविश्वात एन्ट्री, आई अन् मुली एकाच मालिकेत झळकणार, जाणून घ्या…

मुंबईच्या धकाधकीच्या जीवनापासून काही काळ विश्रांती मिळावी यासाठी त्यांनी हे फार्महाऊस खरेदी केलं होतं. आता त्यांच्या या फार्महाऊसमध्ये सर्वसामान्य नागरिकांना देखील राहता येणार आहे. ते स्वत: वीकेंडला या फार्महाऊसवर जात असतात.

हेही वाचा : Video : “जब तक तुम्हारा बाप जिंदा है…”, शाहरुख खानने पत्नी गौरी व मुलांना दिला खास मेसेज, म्हणाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, प्रदीप कबरे यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर आजवर त्यांनी अनेक चित्रपट, मालिका व नाटकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. ‘नवरा माझा नवसाचा’, ‘पछाडलेला’, ‘दैव देते’, ‘कोंडी’, ‘लालबागचा राजा’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय केवळ अभिनेते म्हणूनच नव्हे तर दिग्दर्शकाची जबाबदारी देखील त्यांनी पार पाडली आहे.