Kranti Redkar Sameer Wankhede Video: अभिनेत्री क्रांती रेडकर सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती आपल्या रोजच्या आयुष्यातील छोटे-मोठे प्रसंग, तिच्या जुळ्या मुलींची मस्ती, पती समीर वानखेडे यांच्याबरोबरचे किस्से इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. आता क्रांतीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका व्हिडीओने लक्ष वेधले आहे. या व्हिडीओत ती पती समीर वानखेडेंना एक गुलाबाचं फुल देते.

“मला आज एक छोटसं गुलाब सापडलं आहे. आय होप हे गुलाब आहे. मी कॉलेजमध्ये समीरला कधी गुलाब वगैरे दिलं नाही. आज असा विचार करतेय की देऊनच टाकावं. आपण त्यांची रिअॅक्शन बघुयात,” असं म्हणत क्रांती समीर वानखेडेंजवळ जाते आणि त्यांना गुलाब देते.

समीर वानखेडे पत्नी क्रांतीच्या हातातून गुलाब घेतात. आधी फुलाकडे व नंतर कॅमेऱ्याकडे बघून हसतात व लाजतात. नंतर क्रांती त्यांना काहीतरी सांगते व ते मान हलवतात आणि पुन्हा स्माइल देतात.

“मी गुलाब दिल्यानंतरची माझ्या इंट्रोव्हर्ट पतीची प्रतिक्रिया…आपल्या कोमल मनांना जिवंत ठेवणारे हे क्षण आठवणी बनवतात आणि या आठवणी कायमस्वरुपी राहतात,” असे कॅप्शन क्रांती रेडकरने या व्हिडीओला दिले आहे.

पाहा व्हिडीओ-

क्रांतीच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ‘खूपच भारी’, ‘समीर वानखेडे लाजत आहेत’, ‘ते ज्या पद्धतीने लाजले, त्यांचं तुझ्यावर खूप प्रेम आहे’, ‘मी त्यांना असं हसताना पहिल्यांदा पाहिलं’, ‘तुम्ही दोघे खूप गोड दिसता’, ‘फुलाचा आनंद आणि उटण्याचा ग्लो’, ‘सर खूपच छान हसतात’ अशा कमेंट्स क्रांतीच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी केल्या आहेत.

दरम्यान, क्रांती रेडकर व समीर वानखेडे एकाच कॉलेजमध्ये होते. कॉलेजनंतर दोघांनी वेगवेगळ्या क्षेत्रात करिअर केले. एकदा दोघे विमानतळावर अचानक भेटले. त्यांच्यात मैत्री झाली. मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं आणि या दोघांनी २०१७ साली लग्न केलं. या जोडप्याला जुळ्या मुली आहेत. त्यांची झिया आणि जायदा अशी आहेत. क्रांती मुलींना प्रेमाने गोदो व छबील म्हणते. त्या दोघींचे अनेक किस्से क्रांती व्हिडीओंमध्ये सांगत असते.