अभिनेत्री पूजा सावतंच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर फोटो शेअर करत अभिनेत्रीने साखरपुड्याची घोषणा केली होती. पूजाच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव सिद्धेश चव्हाण असून तो कामानिमित्त ऑस्ट्रेलियात असतो. या दोघांचं लग्न अरेंज मॅरेज पद्धतीत जमलं होतं. अभिनेत्रीने नुकत्याच लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत होणाऱ्या नवऱ्याविषयी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.

पूजा होणाऱ्या नवऱ्याचे आवडते गुण सांगताना म्हणाली, “तो खरंच खूप जास्त गोड आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला चांगलं माहितीये की, काय केल्याने मी हसते किंवा मला छान वाटतं. एवढं तो मला ओळखतो. माझा राग कसा सांभाळायचा हे देखील तो आता शिकला आहे.”

हेही वाचा : “माझ्या नवऱ्याने…” ‘लस्ट स्टोरीज २’मधील इंटिमेट सीनबद्दल अमृता सुभाषचा खुलासा; म्हणाली, “आम्ही दोघंही…”

“त्याने समजूत काढल्यावर माझा राग दुसऱ्या क्षणाला निघून जातो. तो अगदी चांगल्याप्रकारे मला सांभाळून घेतो. सिद्धेशमधले हे गुण मला खरंच खूप आवडतात.” असं पूजाने सांगितलं. याशिवाय सासूबाईंबद्दल विचारलं असता अभिनेत्री म्हणाली, “मला माझ्या सासूबाई खरंच खूप आवडतात. त्या खूपच गोड आहेत. त्यांना माझे सिनेमे सुद्धा माहिती आहेत. मी आजवर कोणती कामं केली, माझा परफॉर्मन्स कधी असतो? या सगळ्या गोष्टी त्यांच्या खूप चांगल्या लक्षात असतात. कधी-कधी मला असं वाटतं सिद्धेशपेक्षा त्यांना माझ्या कामाबद्दल अनेक गोष्टी माहिती आहेत.”

हेही वाचा : सोनू निगमने मागितली पाकिस्तानी गायकाची माफी; सोशल मीडियावर स्क्रीनशॉट व्हायरल, म्हणाला, “दुबईतील माझे…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, गुपचूप साखरपुडा उरकल्यावर पुढच्या वर्षी पूजा जवळचे नातेवाईक व कलाविश्वातील मित्र मंडळींच्या उपस्थितीत लग्नबंधनात अडकणार आहे. अभिनेत्रीच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर आजवर तिने ‘क्षणभर विश्रांती’, ‘दगडी चाळ’, ‘चीटर’, ‘नीळकंठ मास्तर’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. लवकरच पूजा ‘मुसाफिरा’ या चित्रपटाच्या माध्यामातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.