मराठी कलाविश्वात सध्या लगीनघाई सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. मुग्धा-प्रथमेश, गौतमी-स्वानंद, आशिष-स्वानंदी, सुरुची-पियुष या जोडप्यांच्या पाठोपाठ आता आणखी एक अभिनेत्री लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. ‘दगडी चाळ’ फेम पूजा सावंतने काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर होणाऱ्या नवऱ्याबरोबरचे रोमँटिक फोटो शेअर करत प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव सिद्धेश चव्हाण असं आहे. परंतु, सुरुवातीला पूजाने सिद्धेशचा चेहरा न दाखवता पाठमोरे फोटो शेअर केल्याने इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीचा होणारा नवरा कोण आहे? याबद्दल चांगलीच चर्चा रंगली होती.

पूजाने सुरुवातीला होणाऱ्या नवऱ्याबरोबर पाठमोरे फोटो का शेअर केले? याबद्दल तिला ‘रेडिओ सिटी मराठी’च्या मुलाखतीत विचारण्यात आलं. यावर अभिनेत्री म्हणाली, “मी पाठमोरा फोटो शेअर केल्यावर सगळेजण वेगवेगळा अंदाज बांधणार याची मला चांगलीच कल्पना होती. काही लोकांना तो भूषण किंवा वैभव वाटणार याचीही मला खात्री होती. पण, अनेकांना साइड फेसने सिद्धेश आदिनाथसारखा वाटला.”

हेही वाचा : केदार शिंदे – हरहुन्नरी दिग्दर्शकाची बहुढंगी सफर

“मी हा निर्णय अगदी विचारपूर्वक घेतला होता. माझ्या वैयक्तिक आयुष्यात काय सुरू आहे याची कोणालाच माहिती नव्हती. त्यामुळे सगळ्यात आधी पाठमोरे टाकायचे हे आधीच ठरवलं होतं. योग्य व्यक्ती आयुष्यात आल्यावर सगळ्या गोष्टी बदलतात. जे आपल्या नशिबात असतं ते सगळं आपल्याला मिळतं.” असं पूजा सावंतने सांगितलं.

हेही वाचा : “महाराष्ट्रीय असल्याचा आनंद आहे, पण…”; मृणालसोबतच्या फोटोवर युजरच्या ‘त्या’ कमेंटला शिल्पा तुळसकरने दिलं उत्तर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, पूजा सावंत व सिद्धेश सावंत लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. याशिवाय अभिनेत्रीच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर ती लवकरच ‘मुसाफिरा’ चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट येत्या २ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये पूजा सावंत, पुष्कर जोग, दिशा परदेशी, भोजपुरी स्टार स्मृती सिन्हा, पुष्कराज चिरपुटकर यांच्या मुख्य भूमिका आहेत.