मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाण यांचा लग्नसोहळा २८ फेब्रुवारी २०२४ रोजी थाटामाटात पार पडला. मेहेंदी, संगीत, हळद मग सत्तपदी असे विधी पार पाडत दोघं लग्नबंधनात अडकले. सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन आयुष्याच्या पुढील वाटचालीसाठी त्यांनी बाप्पाचे आशीर्वादसुद्धा घेतले. त्यानंतर हे कपल हनिमूनला जाताना मुंबई विमानतळावर दिसले होते.

नुकतेचं पूजाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर हनिमूनचे फोटो शेअर केले आहेत. यात ती आणि सिद्धेश बीचवर मजा करताना दिसतायात. या फोटोमध्ये पूजाने फ्लॉवर प्रिंट असलेली बिकिनी घातली आहे आणि त्यावर सफेद रंगाचा शर्ट घातला आहे. तर सिद्धेशने सफेद रंगाची सॅंडो आणि काळ्या रंगाची शॉर्ट्स घातली आहे. एका फोटोमध्ये बीचवर पूजा पाण्याबरोबर खेळताना दिसतेय. बीचवरील दोघांचे रोमॅंटीक फोटोजही तिने शेअर केले आहेत.

सिद्धेशचा एक वेगळा फोटो पोस्ट करत त्याच्याबद्दल लिहिताना पूजा म्हणाली, “मी सूर्यास्त चुकवणार नाही याची तो खात्री करतोय”. लग्नानंतर दोघंही त्यांचा क्वालिटी टाईम घालवताना दिसतायत. पूजाच्या या फोटोजवर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. “सुंदर कपल”, “पूजा या बिकिनीमध्ये खूप सुंदर दिसतेय” अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.

हेही वाचा… हिरवा चुडा, मेहेंदीने रंगलेले हात… पूजा सावंतने शेअर केले हनिमूनचे फोटो; म्हणाली, “अजूनही…”

View this post on Instagram

A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, पूजा आणि सिद्धेशच्या नात्याबद्दल सांगायचं झालं, तर पूजाने एक अनोखी पोस्ट शेअर करत तिच्या आणि सिद्धेशच्या नात्याबद्दल खुलासा केला होता. त्यानंतर १६ फेब्रुवारी रोजी साखरपुडा करत पूजानं चाहत्यांना सुखद धक्का दिला. पूजा आणि सिद्धेशच्या लग्नसोहळ्याला प्रार्थना बेहेरे, भूषण प्रधान, वैभव तत्त्ववादी, सुखदा व अभिजीत खांडकेकर अशा अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.