Pooja Sawant Special Post For Husband : महाराष्ट्राची ‘कलरफूल’ अभिनेत्री पूजा सावंतचा विवाहसोहळा फेब्रुवारी २०२४ मध्ये मोठ्या थाटामाटात पार पडला होता. त्याआधी सोशल मीडियावर फोटो शेअर करत अभिनेत्रीने प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. पूजाचं लग्न अरेंज मॅरेज पद्धतीने जमलं होतं. तिच्या नवऱ्याचं नाव सिद्धेश चव्हाण असून या जोडप्याने २८ फेब्रुवारी २०२४ रोजी लग्नगाठ बांधली.

लग्नानंतर पूजा ऑस्ट्रेलिया ते भारत असा प्रवास करत असते. कारण, तिचा नवरा कामानिमित्त ऑस्ट्रेलियात असतो. आज नवऱ्याच्या वाढदिवसानिमित्त पूजाने खास पोस्ट शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

पूजा तिच्या नवऱ्याला म्हणजेच सिद्धेशला प्रेमाने ‘Siddy’ म्हणते. तिच्या बऱ्याच पोस्टमध्ये सिद्धेशचा उल्लेख ‘Siddy’ असा केलेला असतो. तर, अभिनेत्रीच्या जवळचा मित्रपरिवार सुद्धा पूजाच्या नवऱ्याला प्रेमाने Sid, Siddy अशी हाक मारतो. अभिनेत्रीच्या पोस्टवर अभिजीत खांडकेकर, अमृता खानविलकर, भार्गवी चिरमुले, मानसी नाईक, भूषण प्रधान यांनी कमेंट्स करत पूजाच्या नवऱ्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

पूजा सिद्धेशला शुभेच्छा देत लिहिते, “हॅप्पी बर्थडे सिड्डी बॉय…तू माझ्या आयुष्यात पाऊल ठेवल्यापासून प्रत्येक क्षण सोन्यासारखा वाटू लागला आहे. तू माझ्या आयुष्याचा हा प्रवास सुंदररित्या सजवला आहेत. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.”

पूजाच्या या पोस्टवर सिद्धेशने खास कमेंट करत बायकोचे आभार मानले आहेत. तो लिहितो, “तुझं प्रेम, तू माझ्या आयुष्यात भरलेला आनंद यासाठी मी खूप आभारी आहे. बोजू आय लव्ह यू…”

View this post on Instagram

A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, पूजा आणि सिद्धेशचं लग्न हे अरेंज मॅरेज पद्धतीत जमलं होतं. अभिनेत्रीचा नवरा कामानिमित्त ऑस्ट्रेलियात असतो. अभिनेत्रीने तिच्या आणि सिद्धेशच्या नात्याबद्दल सर्वप्रथम गश्मीर महाजनीची बायको गौरीला सांगितलं होतं. यानंतर गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात जोडीदाराबरोबर फोटो शेअर करत पूजाने सर्वांनाच सुखद धक्का दिला होता. आता ही जोडी ऑस्ट्रेलियात सुखाचा संसार करत आहे.