शाहरुख खानच्या जुन्या चित्रपटातील सगळीच गाणी प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहेत. सामान्य लोकांपासून ते अगदी सेलिब्रिटींपर्यंत कोणालाही या गाण्यांवर थिरकरण्याचा मोह आवरत नाही. सध्या अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांनी शेअर केलेला असाच एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. यामध्ये प्रेक्षकांची ही लाडकी जोडी किंग खानच्या २० वर्षांपूर्वीच्या एका लोकप्रिय गाण्यावर डान्स करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

शाहरुख खानचा बहुचर्चित ‘मैं हूँ ना’ हा चित्रपट २००४ साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यामध्ये किंग खानसह विश्वसुंदरी सुश्मिता सेनने प्रमुख भूमिका साकारली होती. या चित्रपटातील सगळीच गाणी लोकप्रिय झाली होती. यापैकी “गोरी गोरी…” या गाण्यावर प्रसाद – अमृताने डान्स केला आहे.

हेही वाचा : ठरलं तर मग : अर्जुनला रंग लावणार प्रिया अन् सायलीचा होणार संताप! भर कार्यक्रमात धक्का मारून सुनावणार खडेबोल, पाहा प्रोमो

डान्स करतानाचा व्हिडीओ शेअर करत अमृता लिहिते, “आमच्या सराव सत्रातील काही क्षण मी इथे शेअर करते कारण, कोरिओग्राफी आम्ही दोघंही आधीच विसरलो आहोत. आता गोड मानून घ्या (प्रसादसारखं)”

हेही वाचा : महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांचा नातू होणार कपूर कुटुंबीयांचा जावई? जान्हवीच्या बॉयफ्रेंडबद्दल वडिलांचं सूचक विधान; म्हणाले…

View this post on Instagram

A post shared by Amruta Deshmukh (@khwabeeda_amruta)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, प्रसाद-अमृताने गेल्यावर्षी लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. त्यांच्या या गोड व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. “शाहरुख खानची पोज दोघांनीही भारी केली आहे”, “तुम्ही दोघे सुंदर दिसता”, “आमचं फेव्हरेट कपल”, “वा झकास” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर केल्या आहेत.