मराठी अभिनेता व दिग्दर्शक प्रसाद खांडेकर खूप लोकप्रिय आहे. त्याने आजवर अनेक नाटकांचं दिग्दर्शन, लेखन केलंय. तो उत्तम अभिनेताही आहे. प्रसाद ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी मालिकेत अभिनेता व लेखक आहे. लवकरच तो मराठी सिनेमात दिग्दर्शक म्हणून पदार्पण करतोय. त्याचा ‘एकदा येऊन तर बघा’ हा सिनेमा ८ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. नुकतीच प्रसादने एक मुलाखत दिली, यावेळी त्याने त्याचे वडील महादेव खांडेकर यांचं निधन झालं, त्यादिवशी त्यांची भेट न झाल्याची आठवण सांगितली.

प्रसाद खांडेकरचे वडील महादेव खांडेकर हे शिवसेनेचे शाखाप्रमुख होते. ‘मित्र म्हणे’ या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत प्रसाद म्हणाला, “मी १४ वर्षांचा असताना बाबा गेले. मला वाचनाची आवड त्यांनी लावली होती. मला त्यांनी सांगितलं होतं की रामचंद्र सडेकरांचं ‘सोनेरी टोळी’ हे पुस्तक घेऊन ये आणि वाच. ते पुस्तक मला वाचनालयात सापडत नव्हतं. ते सतत वाचायला असायचं. खूप व्यग्र असायचं ते पुस्तक. एकेदिवशी मला ते सापडलं आणि मी घेऊन आलो.”

फुलंब्रीकर कुटुंबाच्या हॉटेलमध्ये कॉमेडीचा तडका! २० लाखांमुळे येणार अनोखा ट्विस्ट, ‘एकदा येऊन तर बघा’चा ट्रेलर प्रदर्शित

पुढे प्रसाद म्हणाला, “घरी गेल्यावर कळलं की बाबा घरी नाहीत. माझे बाबा शिवसेनेचे शाखाप्रमुख होते. बाबा कामावर गेले होते, मी वाट बघत बसलो. आमची दुधाची डेअरी होती. बाबा कामावरून थेट डेअरीवर जायचे. मी डेअरीवर त्यांची वाट बघत थांबलो. तर मला कळलं की बाबा घरी गेलेत, मला ते पुस्तक त्यांना दाखवायचं होतं. मग मी सायकल घेऊन घरी गेलो तर कळलं बाबा शाखेत गेलेत. मी ते पुस्तक घेऊन शाखेत गेलो. तिथे गेल्यावर कळलं की दुसऱ्या दिवशी सेनेचा भगवा सप्ताह होता तिथे गेलेत. मी तिथेही गेलो, तिथून कळलं की बाबा तिथूनही गेलेत. आणि रात्री अचानक बातमी आली की बाबा गेलेत. ते पुस्तक त्यांना शेवटपर्यंत दाखवायचं राहून गेलं,” अशी वडिलांची आठवण प्रसादने सांगितली.

View this post on Instagram

A post shared by Prasad Khandekar (@prasadmkhandekarofficial)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, प्रसाद खांडेकरच्या आगामी सिनेमाबद्दल बोलायचं झाल्यास यामध्ये मराठीतील आघाडीच्या कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे. सयाजी शिंदे, गिरीश कुलकर्णी, तेजस्विनी पंडित, प्रसाद खांडेकर, ओंकार भोजने, नम्रता संभेराव, विशाखा सुभेदार, भाऊ कदम, पॅडी कांबळे, राजेंद्र शिसटकर, वनिता खरात, रोहित माने, शशिकांत केरकर, सुशील इनामदार, जय चौबे, राकेश शालिन या चित्रपटात प्रेक्षकांना खळखळून हसवणार आहेत.