प्रसाद ओक याने काही दिवसांपूर्वी त्याच्या आगामी जिलबी या चित्रपटाची घोषणा केली होती. तर नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त पार पडल्याचंही त्याने सोशल मीडियावरून सर्वांबरोबर शेअर केलं होतं. तेव्हापासूनच या चित्रपटामध्ये कोणते कलाकार दिसणार याबद्दल प्रेक्षकांना खूप उत्सुकता होती. तर आता ते कोडं सुटलं आहे.

आनंद पंडित मोशन पिक्चर यांची निर्मिती असलेला ‘जिलबी’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे सध्या या चित्रपटाचे जोरदार चित्रीकरण सुरु आहे. या चित्रपटाच्या प्रसिद्धीसासाठी एक मजेशीर व्हिडीओ कलाकारांनी बनवला आहे. या व्हिडीओमध्ये चित्रपटाचे दिग्दर्शक नितीन कांबळेही दिसत आहेत.

आणखी वाचा : स्वप्निल जोशी ‘तू तेव्हा तशी’ मालिकेच्या एका भागासाठी आकारतो ‘इतके’ मानधन, किंमत ऐकून व्हाल थक्क

त्यानुसार, स्वप्नील जोशी आणि प्रसाद ओक हे दोघंही ‘जिलबी’ चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहेत. दोन गोड माणसं एकत्र आल्यावर चित्रपटाचा ‘गोडवा’ नक्कीच वाढणार असं दिग्दर्शक नितीन कांबळे सांगतात. रसिक प्रेक्षकांचा आनंद द्विगुणीत करायला चांगला विषय प्रेक्षकांसाठी घेऊन येत असल्याचे निर्माते आनंद पंडित यांनी सांगितले. या दोघांसोबत ‘जिलबी’ चित्रपटात शिवानी सुर्वे, पर्ण पेठे, गणेश यादव, प्रणव रावराणे,अश्विनी चावरे, प्रियांका भट्टाचार्य या कलाकारांच्या भूमिका आहेत.

हेही वाचा : “अचानक मोठी झाली यार…”; लेकीसाठी पोस्ट लिहीत स्वप्निल जोशी भावूक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कथा-पटकथा-संवाद मच्छिंद्र बुगडे यांचे आहेत. छायांकन गणेश उतेकर यांचे आहे. कलादिग्दर्शन कौशलसिंग यांचे असून क्रिएटिव्ह दिग्दर्शन राहुल व्ही.दुबे यांचे आहे. रूपा पंडित आणि राहुल व्ही.दुबे सहनिर्माते असून कार्यकारी निर्माते महेश चाबुकस्वार आहेत.