लोकप्रिय अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद ओक ( Prasad Oak ) सध्या मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या कलाकारांपैकी एक आहे. प्रसाद ओक सोशल मीडियावर फार सक्रिय असतो. आपल्या आगामी चित्रपटांविषयी चाहत्यांना माहिती देत असतो. नुकतचं त्याने बायको मंजिरी ओकची माफी मागत एक व्हिडीओ शेअर केला आहे. प्रसाद व मंजिराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

अभिनेता प्रसाद ओकने ( Prasad Oak ) “सॉरी, सॉरी मंजिरी…अगं चुकून पोस्ट झालं”, असं कॅप्शन देत मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मंजिरी ओक प्रसादच्या मागे बसून डोक्यावर साडीचा पदर घेऊन नमस्कार करताना दिसत आहे. या व्हिडीओच्या मागे ‘भागम भाग’ चित्रपटातील अक्षय कुमाराचा डायलॉगचा ऑडिओ आहे. ‘शक्ल देखो कितनी भोली है, लेकिन अंदर से लोमड़ी है’, या डायलॉगवर प्रसाद अभिनय करताना दिसत आहे. प्रसाद व मंजिरीचा हा मजेशीर व्हिडीओ व्हायरल झाला असून कलाकार मंडळींसह चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हेही वाचा – “तू माझ्या आयुष्यात अशा वेळी आलीस…”, ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्याने होणारी बायको शिवानी सोनारसाठी लिहिली खास पोस्ट

प्रसादने शेअर केलेल्या या व्हिडीओवर मंजिरीने मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. “सॉरी सॉरी प्रसाद ( Prasad Oak ) , माझे डोळे बंद होते, कान चुकून उघडे राहिले रे.” तसंच स्वप्नील जोशी प्रसाद व मंजिरीचा व्हिडीओ पाहून म्हणाला, “अरे, तुला भीती नाही आहे का?” तर अभिनेत्री क्रांती रेडकर म्हणाली, “तुम्ही दोघांनी अजून व्हिडीओ करा. तुम्ही दोघं मला खूप आवडता.”

हेही वाचा – अमिताभ बच्चन व अभिषेक बच्चन या बापलेकाच्या जोडीचं नाव आहे ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड’मध्ये, जाणून घ्या यामागचं कारण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रसाद ओकचे आगामी चित्रपट जाणून घ्या…

दरम्यान, प्रसाद ओकच्या ( Prasad Oak ) कामाबद्दल बोलायचं झालं तर, सध्या त्याच्या ‘धर्मवीर-२’ चित्रपटाची चर्चा रंगली आहे. २७ सप्टेंबरला ‘धर्मवीर-२’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याआधी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख ९ ऑगस्ट होती. पण काही दिवसांपूर्वी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली. ‘धर्मवारी-२’ चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. याव्यतिरिक्त प्रसाद ओक ‘वडापाव’, ‘जिलबी’, ‘पठ्ठे बापूराव’, ‘महापरिनिर्वाण’ , ‘रीलस्टार’ या आगामी चित्रपटांमध्ये पाहायला मिळणार आहे.