महाराष्ट्रातील लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीतील एक अभिनेता म्हणजे प्रसाद ओक. गेल्या अनेक वर्षांपासून प्रसादने त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. नाटक, मालिका किंवा चित्रपट या सर्वच माध्यमात त्याने उत्कृष्ट भूमिका साकारल्या आहेत. दरम्यान प्रसाद एका नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आपल्या इन्स्टाग्रामवर प्रसादने याबाबतचा व्हिडीओ शेअर केला आहे.

हेही वाचा- ‘हर एक फ्रेंड जरूरी होता है’ म्हणतं सोनाली कुलकर्णीनं खास मैत्रिणीबरोबरचा डान्स व्हिडीओ केला शेअर

प्रसाद ओकचा परिनिर्वाण चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अधारित असणाऱ्या या चित्रपटात प्रसाद ओकची मुख्य भूमिका आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणालाही सुरुवात झाली आहे. दरम्यान प्रसादने आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये प्रसादचा परिनिर्वाण चित्रपटातील लूक दिसत आहे. व्हिडीओ पोस्ट करत प्रसादने लिहिलं “वंदनीय बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस अभिवादन करुन “परिनिर्वाण” ची तयारी सुरु झालेली आहे. मोठ्ठया जबाबदारीची जाणीव झालेली आहे. महामानवाचा आशीर्वाद पाठीशी आहेच. तुमच्या शुभेच्छांची आणि प्रेमाची गरज आहे…!!!”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान प्रसाद ओकचा नवा चित्रपट “वडापाव” लवकरच प्रदर्शित होणार आहे. लंडनमध्ये या चित्रपटाचे शुटींग सुरु आहे. काही दिवसांपूर्वी प्रसादने शुटींगदरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअऱ केला होता.या चित्रपटात प्रसाद ओक, गौरी नलावडे, अभिनय बेर्डे, रितिका श्रोत्री, रसिका वेंगुर्लेकर, सिद्धार्थ साळवी, शाल्व किंजवडेकर, सविता प्रभुणे हे कलाकार प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत.