‘टाईमपास’ या मराठी चित्रपटामुळे लोकप्रिय झालेला अभिनेता प्रथमेश परबने आतापर्यंत हिंदीसह मराठी सिनेविश्वात काम केलं आहे. लवकरच त्याचा ‘डिलिव्हरी बॉय’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण मागच्या काही दिवसांपासून तो कामामुळे नाही तर त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आहे. प्रथमेश लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.

प्रथमेश परबने मागच्या वर्षी व्हॅलेंटाईन डेला प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर यंदाच्या व्हॅलेंटाईन डेला तो क्षितिजा घोसाळकरशी साखरपुडा करणार आहे आणि त्यानंतर दोघांचं लग्न होणार आहे. क्षितिजाने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत साखरपुडा व लग्नाची तारीख जाहीर केली आहे. १४ फेब्रुवारीला दोघांचा साखरपुडा असून त्यानंतर १० दिवसांनी २४ फेब्रुवारीला त्यांचं लग्न होणार आहे. क्षितिजाने पोस्टबरोबर सुंदर कॅप्शनही दिलं आहे.

“माझा व काजोलचा किसिंग सीन मी पत्नी अन् मुलीबरोबर पाहिला”, अभिनेत्याचा खुलासा; त्यांची प्रतिक्रिया सांगत म्हणाला…

दरम्यान, प्रथमेशने नवीन वर्षाच्या दिवशी एक पोस्ट शेअर करत लवकरच लग्न करणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर त्याने केळवणाचे फोटो व व्हिडीओही शेअर केले होते. अखेर लग्नाला बरोबर एक महिना बाकी असताना त्यांनी लग्नाच्या तारखेची घोषणा एक छानसा फोटो शेअर करत केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

क्षितिजाने प्रथमेशला टॅग करून ही पोस्ट केली आहे. रुतुजा बागवेसह अनेकांनी प्रथमेश व क्षितिजाला या पोस्टवर कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत.