‘बालक पालक’, ‘टाइमपास’, ‘उर्फी’, ‘टकाटक’ यांसारख्या चित्रपटातून घराघरात पोहोचलेला अभिनेता प्रथमेश परब काही दिवसांपूर्वी लग्नाच्या बेडीत अडकला. २४ फेब्रुवारीला प्रथमेशने क्षितिजा घोसाळकरशी लग्नगाठ बांधली. अजूनही त्याच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ चर्चेत आहेत. अशातच दोघं लग्नानंतर पहिल्यांदा कुठे फिरायला गेलेत? हे समोर आलं आहे.

अभिनेता प्रथमेश परब हा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. लग्नाच्या काही दिवसांनंतर प्रथमेशने बायको क्षितिजाने घेतलेल्या भन्नाट उखाण्याचा व्हिडीओ शेअर केला होता; जो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. त्यानंतर आता अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे; ज्यामधून ते कुठे फिरायला गेले आहेत? याचा खुलासा झाला आहे.

हेही वाचा – “आम्ही दीड वर्ष…”, पूजा सावंतने सांगितली तिची फिल्मी लव्हस्टोरी, म्हणाली…

लग्नानंतर पहिल्यांदाच प्रथमेश व क्षितिजा लोणावळ्याला फिरायला गेले आहेत. प्रथमेशने फोटो शेअर करत लिहिलं आहे, “दोघांच्याही व्यग्र शेड्युलमुळे २, ३ महिन्यांनंतर कुठेतरी फिरायला जाऊया, असं ठरलं. पण त्याआधी आवर्जुन थोडासा वेळ काढून एका ठिकाणाला भेट द्यावीशी वाटली. जिथे असंख्य Long Drives, Memorable Sunsets, Birthday celebrations, कांदाभजी, मिसळ आणि न संपणाऱ्या गप्पा…एक ना अनेक आठवणी आहेत. आज त्या सगळ्यांना भेटायला आलो आहोत.”

हेही वाचा – सिद्धेशचा पहिल्यांदा फोटो पाहताच घाईघाईत निघालेली पूजा सावंत थांबली अन्…; किस्सा सांगत म्हणाली…

दरम्यान, प्रथमेश-क्षितिजाची पहिली ओळख इन्स्टाग्रामवर झाली होती. त्यानंतर इन्स्टाग्रामवर गप्पा मारत-मारत दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. ‘टाइमपास ३’च्या चित्रीकरणादरम्यान पहिल्यांदाच प्रथमेश व क्षितिजा भेटले. यानंतर दोघांची मैत्री आणखी दृढ झाली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यामुळे आता दोघांनी संसार थाटायचा निर्णय घेतला.