छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. या कार्यक्रमाने मराठी मनोरंजनसृष्टीला अनेक गुणी कलाकार दिले. गौरव मोरे, ओंकार राऊत, वनिता खरात, निखिल बने, निमिष कुलकर्णी, शिवाली परब या सर्वांनी आपल्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. यातील एक म्हणजे पृथ्वीक प्रताप. आपल्या अतरंगी अभिनयाच्या जोरावर पृथ्वीक आज लोकप्रिय झाला आहे. असा हा लोकप्रिय अभिनेता पृथ्वीकचा पहिला चित्रपट ‘डिलिव्हरी बॉय’ आजपासून प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.

मोहसिन खान दिग्दर्शित ‘डिलिव्हरी बॉय’ या चित्रपटात प्रमुख भूमिकेत अभिनेता प्रथमेश परब, पृथ्वीक प्रताप आणि अंकिता लांडेपाटील प्रमुख भूमिकेत झळकले आहेत. पृथ्वीकचा हा पहिलाच चित्रपट असून लेकाचा हा पहिला चित्रपट पाहून आईची प्रतिक्रिया काय होती? जाणून घ्या…

हेही वाचा – Video: शाहिद कपूरच्या गाण्यावर ऐश्वर्या नारकर-अविनाश नारकरांच्या जबरदस्त डान्स, व्हिडीओ व्हायरल

‘राजश्री मराठी’ एंटरटेनमेंट युट्यूब चॅनेलशी पृथ्वीक व त्याच्या आईने संवाद साधला. यावेळी पृथ्वीकच्या आईला ‘डिलिव्हरी बॉय’ चित्रपटातील अभिनेत्याच्या कामाविषयी विचारलं. तेव्हा पृथ्वीकची आई म्हणाली, “त्याची आई म्हणून खूप आनंद वाटतोय. तसंच मुलगा दिवसेंदिवस अजूनचं पुढे जातोय, त्यामुळेही खूप आनंद होतोय. मी आज पहिल्यांदाच चित्रपट बघायला आली आहे.”

हेही वाचा – अलीकडेच सरकार दरबारी कौतुक झालेल्या ‘या’ मराठी अभिनेत्याची ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटात वर्णी, म्हणाला, “ज्या लोकांना…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे पृथ्वीकची आई भावुक होऊन म्हणाली, “अजून तो खूप मोठा होऊ दे. त्याचे अधिक सिनेमे येऊ दे. अजून खूप मोठा माणूस होऊ दे. आज मला पृथ्वीक प्रतापची आई म्हणून लोक ओळखतात. कुठेही गेली तरी…आम्ही तुमच्या मुलाचा कार्यक्रम बघतो..हे जेव्हा बोलतात तेव्हाच खूप बरं वाटतं. भरून येतं…आता हे आनंदाचे आश्रू येते आहेत. हा खूप मेहनत करतो. रात्री उशीरा घरी येतो, कधी जेवतो, कधी जेवत नाही. असाच झोपतो. सकाळी उठून तसाच निघून जातो. खूप स्ट्रगल करतो. त्या स्ट्रगलचं त्याला भरभरून यश मिळावं.”