‘गुलाबी साडी’ या गाण्याने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. लहान मुलांपासून ते बड्या सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकजण या गाण्यावर थिरकत असल्याचं पाहायला मिळत आहे. संजू राठोडच्या या गाण्याला सगळ्यांनीच पसंती दर्शवली आहे. मराठी कलाविश्वातील लाडकं जोडपं प्रिया बापट आणि उमेश कामत यांनी देखील या गाण्यावर डान्स केला आहे.

प्रिया बापट आणि उमेश कामत ही मराठी प्रेक्षकांची आवडती जोडी. सध्या दोघेही ‘जर तरची गोष्ट’ या नाटकाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. प्रिया-उमेश सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. त्यांनी नुकताच ‘गुलाबी साडी’ या व्हायरल गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. परंतु, हा व्हिडीओ शेअर करण्यामागचं कारण खूपच खास आहे.

हेही वाचा : स्वप्न सत्यात उतरलं! ‘लावणीकिंग’ आशिष पाटीलने सुरू केला स्वत:चा डान्स स्टुडिओ! वास्तुपूजनाचा व्हिडीओ केला शेअर

गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात प्रिया-उमेशचं ‘जर तरची गोष्ट’ हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला आलं. या नाटकाला प्रेक्षकांकडून हाऊसफुल्ल प्रतिसाद मिळत असून लवकरच याचा शंभरावा प्रयोग पार पडणार आहे. “येत्या ७ एप्रिलला आमच्या ‘जर तरची गोष्ट’ या नाटकाचा शंभरावा प्रयोग असल्याने आमचा आनंद गगनात मावेनासा झालाय…” असं कॅप्शन देत प्रियाने हा डान्सचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

हेही वाचा : कुणीतरी येणार येणार गं! कार्तिकी गायकवाड लवकरच होणार आई, डोहाळे जेवणाचा व्हिडीओ आला समोर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रियाच्या व्हिडीओवर गायक संजू राठोड, अविनाश नारकर, आरती मोरे, पूर्वा फडके यांनी कमेंट करत या जोडप्याचं कौतुक केलं आहे. दरम्यान, ‘जर तरची गोष्ट’ या नाटकाबद्दल सांगायचं झालं, तर यामध्ये प्रिया आणि उमेश कामतसह पल्लवी अजय, आशुतोष गोखले यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हे नाटक इरावती कर्णिक यांनी लिहिलं असून, याचं दिग्दर्शन अद्वैत दादरकर आणि रणजित पाटील यांनी केलं आहे.