अभिनेत्री प्रिया बापट आणि अभिनेता उमेश कामत मराठी मनोरंजनसृष्टीतील क्यूट कपल मानले जाते. दोघांच्या जोडीला चाहत्यांकडून नेहमीच मोठ्या प्रमाणात पसंती मिळते. आठ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी २०११ मध्ये लग्नगाठ बांधली. त्यांच्या नात्याला १७ वर्षे पूर्ण झाली आहेत. १७ वर्षे एकत्र राहूनही दोघांमध्ये अनेकदा भांडणे होतात. नुकतेच एका मुलाखतीत प्रिया आणि उमेशने त्यांच्या होणाऱ्या भांडणांची कारणे सांगितली आहेत. तसेच त्यांच्या १७ वर्षांच्या नात्याबाबतही अनेक मोठे खुलासे केले आहेत.

हेही वाचा- “सेमी नाही, शमी फायनल झाली!”, भारताच्या विजयानंतर मराठी दिग्दर्शकाची खास पोस्ट, शेअर केलेला ‘तो’ व्हिडीओ चर्चेत

प्रिया आणि उमेश यांनी नुकतीच ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत दोघांनी त्यांच्या करिअरबरोबर वैयक्तिक आयुष्याबाबतचे अनेक खुलासे केले आहेत. उमेश म्हणाला, “आमच्या नात्याची गेली १७ वर्षं ही रोलरकोस्टर राइडसारखी होती. गेल्या १७ वर्षांत आमच्यात काय बदललं, असं विचारलं, तर आमची भांडणंही तीच आहेत अन् प्रेमही तेवढंच आहे. पण, आधी आम्ही वेगवेगळ्या कारणांनी भांडायचो; आता वेगळ्या कारणांनी भांडतो. आम्हाला वाटतं की, आम्ही मनापासून भांडलो नाही, तर प्रेमही मनापासून होणार नाही. मला प्रियाला चिडवणं आणि त्यावरून तिचं चिडणं मनापासून आवडतं. सुरुवातीला तिला हे लक्षात यायचं नाही; पण आता तिच्या हे लक्षात येतं की, मुद्दामहून तिला चिडवतो.”

प्रिया म्हणाली, “आमच्या भांडणांची कारणंही वेगळीच असतात. भांडणं कशावरून होतात? तर माझ्या कपाटातल्या कपड्यांच्या जागी तू तुझे कपडे का ठेवलेस आणि तुझे कपडे काढताना माझे का पडले? माझे कपडे पडले, तर तू उचलून का नाही ठेवलेस? खाता खाता शर्टवर सांडतंच कसं? एकमेकांची चूक दाखवली की, आम्हाला ती मान्यच नसते. भांडणं ही करीत राहावीत. भांडणं असायलाच पाहिजेत. कुठल्या गोष्टींवर तुम्ही भांडताय हे महत्त्वाचं आहे. आमच्यामध्ये कधीही तत्त्वं, राहणीमान यावरून भांडणं झाली नाहीत. आमचे विचार, तत्त्वं, लाइफस्टाईल सेम आहे.”

हेही वाचा- मिताली मयेकरने नवरा सिद्धार्थला पाडव्याचे दिले ‘हे’ महागडे गिफ्ट; किंमत किती आहे माहीत आहे का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रिया आणि उमेशच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर काही दिवसांपूर्वीच दोघांचं ‘जर तर ची गोष्ट’ हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या नाटकाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. नाटकाचे सगळे शो हाऊसफुल्ल होताना दिसत आहेत. या नाटकाच्या माध्यमातून दोघांनी १० वर्षांनंतर एकत्र काम केलं आहे.