अभिनेत्री प्रिया बापटने ‘जर तरची गोष्ट’ या नाटकाच्या निमित्ताने तब्बल १० वर्षांनी रंगभूमीवर पुनरागमन केले आहे. या नाटकात प्रिया बापट उमेश कामतसह मुख्य भूमिका साकारत आहे. प्रिया-उमेशचे चाहते गेल्या कित्येक दिवसांपासून त्यांना रंगभूमीवर एकत्र पाहण्यासाठी उत्सुक होते. या नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग ५ ऑगस्टला ठाण्यात आणि त्यानंतर दुसरा प्रयोग पुण्यात पार पडला. हे दोन्ही प्रयोग ‘हाऊसफुल्ल’ होते. नाटकाला मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहून प्रियाने तिच्या इन्स्टाग्रामवर खास व्हिडीओ शेअर केला आहे.

हेही वाचा : HBD Mahesh Babu : “सेटवर प्रेम, ४ वर्ष गुपचूप डेटिंग अन्…”, ‘अशी’ आहे सुपरस्टार महेश बाबू आणि मराठमोळ्या नम्रता शिरोडकरची फिल्मी लव्हस्टोरी

१० वर्षांनी रंगभूमीवर केलेले पुनरागमन आणि प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद पाहून प्रिया बापट लिहिते, “रंगभूमीवर पुनरागमन करण्याचा माझा निर्णय एकदम योग्य होता. रंगभूमी म्हणजे थेट प्रक्षेपण, रंगभूमी म्हणजे ऊर्जा, देहबोली, तीव्रता, एनर्जीने काम करणे… चित्रपट आणि ओटीटीवर काम केल्यावर पुन्हा रंगभूमीवर वळणे थोडे आव्हानात्मक होते. परंतु, भरलेले नाट्यगृह, प्रेक्षकांचे प्रेम, त्यांची थेट मिळणारी दाद आणि टाळ्यांचा कडकडाट यापेक्षा सुखद अनुभव दुसरा कोणताच असू शकत नाही.”

हेही वाचा : “दिग्पालने माझ्या नकळत त्यांना…”, मृणाल कुलकर्णींनी सांगितला सून आणि लेकासह एकत्र काम करण्याचा अनुभव

प्रिया पुढे लिहिते, “माझ्या सहकलाकारांचे मी मनापासून आभार मानते ज्यांनी या संपूर्ण प्रवासात मला साथ दिली. रंगमंचावर काम करण्याचा हा प्रवास नक्कीच अविस्मरणीय आहे.” या संपूर्ण व्हिडीओमध्ये प्रियाने प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद, तालीम करतानाचे व्हिडीओ शेअर केले आहेत.

हेही वाचा : “जोधपुरी सूट, ब्रोच अन्…” ‘केबीसी’च्या आगामी पर्वात अमिताभ बच्चन यांच्या लूकमध्ये होणार बदल, स्टायलिस्ट म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘जर तरची गोष्ट’ या नाटकाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये प्रिया बापट, उमेश कामत, पल्लवी अजय, आशुतोष गोखले यांच्या प्रमुख भूमिका आहेत. नाटकाचे लेखन इरावती कर्णिक यांनी केले असून, दिग्दर्शन अद्वैत दादरकर आणि रणजित पाटील यांनी केले आहे.