Priya Bapat Birthday: प्रिया बापट ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. मराठीसह तिने काही हिंदी चित्रपट आणि काही वेब सीरिजमध्येदेखील काम केले आहे. प्रियाने नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला.
प्रिया बापटने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिचा वाढदिवस कसा साजरा केला हे सांगितले. दिवसभरात तिच्याबरोबर काय घडले, याबाबत प्रिया बापटने सोशल मीडियावर खुलासा केला आहे. तिच्या दिवसाची सुरुवात कशी झाली आणि तिच्या दिवसाचा शेवट कसा झाला, याबद्दल तिने लिहिले आहे.
प्रिया बापट म्हणाली…
प्रिया बापटने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना तिने लिहिले, “उमेश माझा वाढदिवस खास बनवण्यात कधीच चुकत नाही. यावर्षी वाढदिवस घरीच प्रेमाने भरलेल्या वातावरणात साजरा केला. हा वाढदिवस मला हवा तसा अगदी परिपूर्ण होता.”
पुढे तिने लिहिले, “१. सुरुवातीस मी छान व्यायाम केला. २. मी स्वत:ला इजा करून घेतली. ३. बाबा आणि श्वेताने माझे औक्षण केले आणि मग संध्याकाळ माझ्या सर्वात आवडत्या लोकांसह घालवली, जे फक्त मित्रच नाहीत तर ते मी निवडलेले कुटुंब आहेत. पुढे तिने तिच्याबरोबर जे वाढदिवशी होते त्यांना टॅग केले आहे.”
प्रियाने असेही लिहिले की आम्ही हसलो, काही खेळ खेळलो, घाणेरडे विनोद केले, एकमेकांबरोबर चांगला वेळ घालवला आणि पहाटे ३ वाजेपर्यंत आनंद साजरा केला.
प्रियाने शेअर केलेला पहिला फोटो तिने व्यायाम केल्यानंतरचा असल्याचे दिसत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये तिच्या नखाला लागल्याचे पाहायला मिळत आहे. तिसऱ्या फोटोमध्ये तिने तिच्या बाबांना घट्ट मिठी मारल्याचे दिसत आहे; तर चौथ्या फोटोमध्ये तिची बहीण तिचे औक्षण करत असल्याचे दिसत आहे. पुढे तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती केक कापत असल्याचे पाहायला मिळत आहे. उमेशदेखील तिच्याजवळ बसला असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
प्रियाने शेअर केलेल्या या फोटोवर अनेकांनी कमेंट्स करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री नुकतीच बिन लग्नाची गोष्ट या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या चित्रपटात तिच्यासह निवेदिता सराफ, गिरीश ओक आणि उमेश कामतदेखील प्रमुख भूमिकांत आहेत. १२ सप्टेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. आता आगामी काळात चित्रपट किती कमाई करणार आणि प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.