दिवाळीनिमित्त सध्या घराघरांत साफसफाई, रोषणाई, फराळ करण्यास सुरूवात झाली आहे. दिवाळीत पणत्यांची आरास आणि आकाश कंदील यांचं विशेष आकर्षण असतं. आकाश कंदीलामुळे घराला एक वेगळी शोभा येते. आधी दिवाळीत घरोघरी कंदील बनवले जायचे. परंतु, हळुहळू कामाच्या व्यग्र वेळापत्रकामुळे मुंबईकर बाजातून कंदील खरेदी करण्यास प्राधान्य देऊ लागले आहेत. अलीकडच्या काळात बाजारात विविध प्रकारचे, रंगीबेरंगी कंदील उपलब्ध असतात. याच आकाश कंदिलांसंदर्भात प्रिया बापटने शेअर केलेली पोस्ट सध्या चर्चेत आली आहे.

हेही वाचा : Video : अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा होणार आई? पती विराट कोहलीबरोबरचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

प्रिया बापट दरवर्षी घरगुती फराळ व सजावट करत नवरा उमेश कामत आणि तिच्या कुटुंबियांसमवेत दिवाळी साजरी करते. परंतु, यंदा प्रियाने शेअर केलेल्या एका पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या आकाश कंदिलांसंदर्भात अभिनेत्री लिहिते, “प्लास्टिकचे कंदील बघून वीट आला आहे. आपले पारंपरिक कागदाचे कंदील सहजासहजी मिळतच नाहीत. मोजक्या काही टिकाणी मिळतात.”

हेही वाचा : “माझं माहेर आणि सासर दोन्ही…”, शिवानी रांगोळे ‘अशी’ साजरी करणार आहे यंदाची दिवाळी; म्हणाली, “मी आणि विराजस…”

प्रिया बापटने ही खंत व्यक्त करणारी पोस्ट शेअर करत चाहत्यांना एक प्रश्न विचारला आहे. “तुम्हाला कोणता कंदील आवडतो?” असा प्रश्न विचारत प्रियाने “पारंपरिक कंदील व कोणताही कंदील” असे दोन पर्याय नेटकऱ्यांना निवड करण्यासाठी दिले आहेत. आतापर्यंत ९१ टक्के लोकांनी पारंपरिक कंदिलाला पसंती दर्शवली आहे. बाजारात मिळणाऱ्या कागदी पारंपरिक कंदिलांचं प्रमाण कमी झाल्याने अभिनेत्रीने ही सूचक पोस्ट केली होती.

हेही वाचा : “…अन् माझं आयुष्य बदललं”, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अधिपतीने ‘या’ व्यक्तीला दिलं यशाचं संपूर्ण श्रेय; म्हणाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
Priya Bapat
प्रिया बापट

दरम्यान, प्रियाच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर अभिनेत्रीने मराठीसह बॉलीवूडमध्ये स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या सीरिजमुळे प्रिया देशभरात लोकप्रिय झाली. यामध्ये तिने पूर्णिमा गायकवाड हे पात्र साकारलं आहे. याशिवाय सध्या प्रिया ‘जर तरची गोष्ट’ या नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या नाटकाच्या निमित्ताने प्रेक्षकांना तब्बल १० वर्षांनी उमेश-प्रियाची जोडी रंगभूमीवर एकत्र पाहायला मिळाली.