अभिनेत्री प्रिया बापट सध्या तिच्या ‘जर तरची गोष्ट’ या नाटकामुळे प्रचंड चर्चेत आहे. ‘जर तरची गोष्ट’या नाटकाच्या निमित्ताने अभिनेत्रीने जवळपास १० वर्षांनी रंगभूमीवर पुनरागमन केले आहे. नाटकाच्या शुभारंभाच्या प्रयोगाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. प्रिया-उमेशची जोडी प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय असल्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीला तिच्या सासरच्यांबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर प्रियाने काय उत्तर दिले जाणून घेऊया…

हेही वाचा : “माझ्या मित्रांनी पैसे न घेता…”, प्रवीण तरडेंचा ‘मुळशी पॅटर्न’बद्दल खुलासा; म्हणाले, “अडचणीच्या काळात…”

प्रियाला कलाकृती मीडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये “तू कार्यक्रमाला किंवा शूटिंगसाठी बाहेर जाताना अचानक सासरच्या मंडळींपैकी कोणी आले तर तू काय करतेस?” असा प्रश्न विचारण्यात आला यावर प्रिया म्हणाली, “महत्त्वाचे काम किंवा एखादा कार्यक्रम असतो अशावेळी माझ्याकडे पर्याय नसतो. यापूर्वी असे अनेकदा झाले आहे. एकदा रक्षाबंधन सणाच्या दिवशी माझ्या सासरचे सगळेजण आमच्या घरी आले होते. पण, त्याचवेळी मला एका कार्यक्रमासाठी बाहेर जायचे होते. अशावेळी काय करणार? तर, आमच्या दोघांपैकी कोणीतरी एकजण घरी थांबते आणि दुसरा जातो हा एक मार्ग आम्ही काढतो.”

हेही वाचा : Video : “मला नवरा नको गं बाई…”, अमृता खानविलकर सादर करणार भारुड, शेअर केलेल्या व्हिडीओची चर्चा

प्रिया पुढे म्हणाली, “आम्हा दोघांनाही आमचे नातेवाईक खूप आवडतात. त्यांच्यापासून आम्ही कधीच पळ काढलेला नाही. आमच्याकडे येणारे सगळे पाहुणे आम्हाला समजून घेतात. दोघांपैकी एकाला आधी फोन करतात, घरी आहे की नाही याची खात्री करून येतात.” याबद्दल सांगताना उमेश म्हणाला, “आम्ही बाहेर जाताना अचानक कोणीतरी यायचे ही अशी परिस्थिती काही वर्षांआधी अनेकदा निर्माण व्हायची. पण, आता वारंवार फोनवर संपर्कात असल्याने आम्ही आमच्या वेळा त्यांना सांगतो.”

हेही वाचा : “गेली ३६ वर्षे मी संशयास्पद वातावरणात वावरतोय”; संजय मोनेंचं वक्तव्य चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘जर तरची गोष्ट’ या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग ५ ऑगस्टला ठाण्यात संपन्न झाला. उमेश-प्रियाच्या नाटकाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. या नाटकात प्रिया-उमेशसह पल्लवी अजय आणि आशुतोष गोखले यांच्या प्रमुख भूमिका आहेत.