नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ या चित्रपटातून रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर हे दोन नवे चेहरे प्रेक्षकांच्या भेटीला आले. २९ एप्रिल २०१६ रोजी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा ‘सैराट’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला संपूर्ण महाराष्ट्राने अक्षरश: डोक्यावर घेतलं होतं. यामध्ये रिंकूने आर्ची, तर आकाशने परश्या ही भूमिका साकारली होती. ‘सैराट’पासून यांची जोडी घराघरांत लोकप्रिय झाली.

चित्रपट प्रदर्शित होऊन बरीच वर्षे उलटून गेली तरी आजही रिंकू-आकाशला एकत्र पाहून प्रेक्षकांना ‘सैराट’ चित्रपटाची आठवण येते. यामध्ये आर्ची-परश्याची अनोखी व हृदयस्पर्शी प्रेमकहाणी पाहायला मिळाली होती. त्यामुळे सोशल मीडियावर या जोडीला एकत्र पाहिल्यावर दोघांचे चाहते त्यांच्या फोटो व व्हिडीओजवर कमेंट्सचा पाऊस पाडतात. सध्या रिंकू-आकाशने शेअर केलेले असेच काही फोटो सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत.

हेही वाचा : शाही लग्नसोहळ्यानंतर नुपूर शिखरेची पत्नी आयरा खानसाठी रोमँटिक पोस्ट; म्हणाला, “मला तुझ्याबरोबर…”

रिंकू व आकाशने नुकतीच एकत्र आयरा खान आणि नुपूर शिखरेच्या रिसेप्शन पार्टीला हजेरी लावली होती. यावेळी आकाशने काळ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती, तर रिंकूने जांभळ्या रंगाची साडी नेसली होती. दोघांच्या लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. या सोहळ्यातील काही फोटो दोघांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

हेही वाचा : आमिर खानच्या लेकीचा रिसेप्शन पार्टीतला लेहंगा तयार करायला लागले होते तब्बल ‘इतके’ महिने, डिझायनर म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
rinku
रिंकू राजगुरू – आकाश ठोसर

रिंकू-आकाशने शेअर केलेल्या फोटोंवर नेटकऱ्यांनी “आता लवकर लग्न करा”, “अर्ची परश्या तुमची जोडी एक नंबर आहे. भाऊ आता लवकर उरकून टाका”, “तारीख काय ठरली मग लग्नाची” अशा असंख्य कमेंट्स केल्या आहेत. त्यामुळे या लोकप्रिय ऑनस्क्रीन जोडीचे ऑफस्क्रीन फोटो पाहून सध्या सोशल मीडियावर चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळत आहे. परंतु, रिंकू-आकाशने अद्याप या कमेंट्सवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. काही दिवसांपूर्वी एका चाहत्याला ‘आस्क मी सेशन’मध्ये उत्तर देताना रिंकूने ती सिंगल असल्याचं सांगितलं होतं.