Rinku Rajguru – Akash Thosar : नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ या चित्रपटातून रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर हे दोन नवे चेहरे प्रेक्षकांसमोर आले. २९ एप्रिल २०१६ रोजी ‘सैराट’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला संपूर्ण महाराष्ट्राने अक्षरश: डोक्यावर घेतलं होतं. यामध्ये रिंकूने आर्ची, तर आकाशने परश्या ही भूमिका साकारली होती. ‘सैराट’पासून यांची जोडी घराघरांत लोकप्रिय झाली आहे.

‘सैराट’ प्रदर्शित होऊन आता बरीच वर्षे उलटून गेली असली, तरीही आर्ची-परश्याची क्रेझ प्रेक्षकांमध्ये कायम आहे. ‘सैराट’ चित्रपटानंतरही रिंकू आणि आकाश यांच्यात खूप चांगली मैत्री आहे. दोघेही एकत्र भेटल्यावर एकमेकांबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. आमिर खानची लेक आयरा खानच्या लग्नाला रिंकू-आकाशने एकत्र उपस्थिती लावली होती. यावेळी सोशल मीडियावर त्यांचे बरेच फोटो-व्हिडीओ व्हायरल झाले होते. नेटकऱ्यांनी या सगळ्या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पाडल्याने या दोघांच्या फोटोंची सर्वत्र चर्चा रंगली होती.

हेही वाचा : Online TRP – ‘प्रेमाची गोष्ट’ला टाकलं मागे! ‘बिग बॉस मराठी’ची ऑनलाइन TRP मध्ये मोठी झेप; पाहा संपूर्ण यादी…

आकाशने मारला उकडीच्या मोदकांवर ताव

आता रिंकूने आकाशचा ( Rinku Rajguru – Akash Thosar ) एक खास व्हिडीओ तिच्या इन्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. या व्हिडीओने पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. गणपतीच्या सणाला घराघरांत उकडीच्या मोदकांना खूप महत्त्व असतं. हे मोदक सर्वांनाच आवडतात…आकाशचा असाच एक मनसोक्त मोदक खातानाचा व्हिडीओ रिंकूने शेअर केला आहे. यामध्ये अभिनेता उकडीच्या मोदकावर ताव मारत असल्याचं पाहायला मिळत आहे. परश्या मोदक खात असताना आर्चीने त्याचा हा व्हिडीओ शूट करत इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे.

हेही वाचा : Video: मलायका अरोराच्या वडिलांच्या निधनाबद्दल मुंबई पोलिसांची पहिली प्रतिक्रिया; सुसाईड नोट सापडली का? म्हणाले, “अनिल अरोरा यांचा…”

रिंकू राजगुरु व आकाश ठोसर ‘सैराट’नंतर अनेक चित्रपटांमध्ये झळकले आहेत. मात्र, आजही या दोघांना एकत्र पाहून प्रेक्षकांना ‘सैराट’ चित्रपटाची आठवण येते. ‘सैराट’मध्ये आर्ची-परश्याची अनोखी व हृदयस्पर्शी प्रेमकहाणी पाहायला मिळाली होती. त्यामुळे सोशल मीडियावर या जोडीला एकत्र पाहिल्यावर दोघांचे चाहते प्रचंड आनंदी होतात.

हेही वाचा : ४३ वर्षांपूर्वी नापास झालेल्या चाचणीत अखेर चंकी पांडे उत्तीर्ण, ६१ व्या वर्षी मिळाले ड्रायव्हिंग लायसन्स, पोस्ट चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, रिंकू राजगुरु शेवटची ‘झिम्मा २’ चित्रपटात झळकली होती. आता प्रेक्षक रिंकू आणि आकाशच्या जोडीला ( Rinku Rajguru – Akash Thosar ) ‘सैराट’नंतर पुन्हा एकदा ऑनस्क्रीन एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.