बॉलीवूड किंवा हिंदी चित्रपटसृष्टीत आघाडीच्या नायिकांचं एकमेकींशी जुळत नाही असं आपण बऱ्याचदा पाहतो. पण, मराठीत अशी परिस्थिती नाही. मराठी कलाविश्वातील बरेच कलाकार एकमेकांचे खूप घट्ट मित्र आहेत. आपल्याकडच्या आघाडीच्या अभिनेत्री म्हणजेच प्रिया बापट आणि सई ताम्हणकर या दोघी सुद्धा एकमेकींच्या गेल्या अनेक वर्षांपासून घट्ट मैत्रिणी आहेत. या दोघींनी एकाच चित्रपटात देखील काम देखील केलेलं आहे. सई आणि प्रियाचे एकत्र अनेक फोटो व्हायरल होत असतात. अशातच आता प्रिया बापटने शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

हेही वाचा : कार्तिक आर्यनच्या ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटाच्या पोस्टरने वेधलं लक्ष, अभिनेत्याचा जबरदस्त लूक पाहून नेटकरी म्हणाले, “क्या बात है…”

प्रिया बापटने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत

प्रियाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सई आपल्या लाडक्या मैत्रिणीची चक्क हेअर स्टाईल करत असल्याचं पाहायला मिळत आहे. या दोघींच्या व्हिडीओला चाहत्यांनी देखील भरभरून प्रतिसाद दिला आहे. या व्हिडीओमध्ये सई प्रियाच्या केसांची आयनिंग करत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत “माझी सुपरस्टार स्टायलिस्ट हे आमच्या मैत्रीमधलं प्रेम आहे” असं कॅप्शन प्रियाने दिलं आहे.

हेही वाचा : Video: ‘बजरंगी भाईजान’च्या मुन्नीने डान्स व्हिडीओमुळे ट्रोल करणाऱ्यांची बोलती केली बंद; हर्षाली मल्होत्रा ‘इतक्या’ टक्क्यांनी दहावी झाली पास

प्रिया आणि सई दोघीही मराठी कलाविश्वातील आघाडीच्या अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. या दोघींनी ‘वजनदार’ आणि ‘टाइमप्लीज’ अशा दोन चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. ‘वजनदार’मध्ये सईने कावेरी जाधव, तर प्रियाने पूजा ही भूमिका साकारली होती. या दोघींची अफलातून केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. याशिवाय सईने घेतलेल्या नव्या घरात दिवाळीत प्रिया-उमेशने जोडीने हजेरी लावली होती. आता या व्हिडीओमुळे सई-प्रिया पुन्हा एकत्र काम केव्हा करणार याच्या चर्चा रंगल्या आहेत.

हेही वाचा : “तथ्य नसलेल्या बातम्यांचा त्याला खूप त्रास व्हायचा”, मनोज बाजपेयींनी सुशांत सिंह राजपूतच्या आठवणींना दिला उजाळा, म्हणाले…

View this post on Instagram

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रियाने शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. “मराठी मनोरंजनसृष्टीमधलं हे बॉण्डिंग खूप छान आहे”, “आमच्या दोन आवडत्या अभिनेत्री एकाच फ्रेममध्ये” अशा प्रतिक्रिया युजर्सकडून कमेंट्स सेक्शनमध्ये आल्या आहेत. याशिवाय दोघींच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर सई एकामागून एक बॉलीवूड चित्रपट करण्यात व्यग्र आहे. लवकरच तिचा अग्नी चित्रपट रुपेरी पडद्यावर येणार आहे. तसेच आता प्रिया सुद्धा लवकरच बॉलीवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे.