Sai Tamhankar Talk About Aamir Khan : बॉलीवूडमध्ये आपल्या कामामुळे ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे आमिर खान. लवकरच त्याचा ‘सितारे जमीन’ पर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. वेगळ्या धाटणीचे विषय, सामाजिक विषयांवर आधारित चित्रपट आणि त्यातील खास भूमिकांसाठी आमिर खान ओळखला जातो. त्याचमुळे आमिरच्या अभिनयाचे लाखों चाहते आहेत.

अशीच एक मराठी अभिनेत्रीही आमिरची खूप मोठी चाहती आहे, ही अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. मराठीसह हिंदीमध्ये आपल्या अभिनयानं प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या सईने आमिर खानच्या ‘गजनी’ या चित्रपटातही काम केलं आहे. सई अगदी लहानपणापासून आमिरची चाहती आहे. सईला आमिर इतका आवडायचा की, तिने लहानपणी आईकडे आमिरबरोबर लग्न करायची इच्छा व्यक्त केली होती. याबदलद स्वत: सईनेच खुलासा केला आहे.

सईने डिजिटल कॉमेंट्री या युट्यूब वाहिनीशी याबद्दल तिची प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी मुलाखतकाराने ‘तू आमिरची इतकी मोठी चाहती होतीस की, तू त्याचा ‘दिल’ नावाचा चित्रपट आला होता. तेव्हा त्या चित्रपटाच्या अनेक कॅसेट्स जपून ठेवल्या होत्या आणि आईला सांगितलं होतंस की, तुला आमिर खानशी लग्न करायचं आहे. त्यानंतर तू थेट त्याच्या चित्रपटात काम केलंस’ असं म्हटलं. यावर सई ताम्हणकरने ही गोष्ट अगदी खरी असल्याचं सांगितलं.

सई ताम्हणकर इन्स्टाग्राम पोस्ट

यावेळी सई म्हणाली, “हा किस्सा अगदी खराखुरा आहे, म्हणजे १०० टक्के खरा आहे. मला वाटतं आपण आपल्या नकळत काही गोष्ट मागत असतो. आज सोशल मीडियावर अनेक रिल्स येत असतात; त्यात ज्या गोष्टी हव्या आहेत, त्याबद्दल इच्छा कशा व्यक्त कराव्यात असं सांगतात. पण मला ते पटत नाही. मला वाटतं आपण आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी नकळतपणेच मागतो. त्यापैकीच हे एक असावं. “

यानंतर सई म्हणाली, “मला आमिर खूप आवडायचा, अजूनही आवडतो. त्यामुळे हे सगळं इच्छाशक्तीने जुळून आलं आणि ‘गजनी’ चित्रपट घडला असं मला वाटतं. माणूस एखाद्या विशिष्ट ठिकाणी पोहोचल्यानंतर हा विचार करतो की, आता माझ्याकडे गमावण्यासारखं खूप काही आहे. मी काय करू? पण तेव्हा माझ्याकडे गमावण्यासाठी काहीही नव्हतं. चित्रपटात इतकी छोटी भूमिका आहे; तर मी का करू? असा विचार केला असता तर ते कधीच घडलं नसतं.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापुढे सईला ‘गजनी’नंतर तुझी आमिर खानशी भेट झाली आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देताना सई म्हणाली, “गजनी चित्रपटानंतर मी पाणी फाऊंडेशनच्या निमित्ताने त्याच्याबरोबर काम केलं आहे. तेव्हा मी त्यांना माझा हा ‘गजनी’बद्दलचा किस्साही सांगितला. आमिर खान हा खूप हुशार आणि कमाल माणूस आहे.”