हिंदी, दाक्षिणात्य आणि मराठी चित्रपटसृष्टीमधील चर्चेत असणाऱ्या नावांपैकी एक नाव म्हणजे सयाजी शिंदे. सयाजी अभिनयक्षेत्रामध्ये काम करण्याबरोबरच सामाजिक कामही करताना दिसतात. नुकतीच त्यांच्याबाबत एक माहिती समोर आली होती. सयाजी यांच्यावर मधमाशांचा हल्ला झाला होता. पुणे बंगळुरु महामार्गावरील झाडांचं पुनर्रोपण करताना ही घटना घडली. याबाबत आता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आणखी वाचा – …म्हणून १५ वर्षांच्या सुखी संसारानंतर आमिर खानने किरण रावबरोबर घेतला घटस्फोट; अभिनेत्यानेच केला होता खुलासा

सयाजी शिंदे यांनी आतापर्यंत अनेक झाडांचं पुनर्रोपण केले आहे. सध्या पुणे बंगळुरु महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरु आहे. यावेळी त्या ठिकाणी असलेली झाडं वाचवण्यासाठी ते तासवडे या ठिकाणी उपस्थित होते. यावेळी पुणे बंगळुरु महामार्गावरील झाडांचं पुनर्रोपण करतेवेळी मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला केला. या सगळ्या प्रकरणानंतर मी आता कोणत्याही त्रासामध्ये नसल्याचं सयाजी यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना सांगितलं.

आणखी वाचा – Video : स्वयंपाक घर, वॉर्डरोब, अन्…; फारच सुंदर आहे वनिता खरातचं घर; व्हिडीओमध्ये दाखवली झलक

ते म्हणाले, “माझ्यावर मधमाशांचा हल्ला झाला. मला आता काही त्रास नाही. दोन ते तीन मधमाशा चावल्या. मानेला थोडी सूज आहे. पण आता मी ठिक आहे. पुणे-बंगळूर हायवेदरम्यान रस्ता रुंदीकरणासाठी वृक्ष तोड केली जात आहे. पण ही झाडं वाचवण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत.”
“२०० वर्ष जुनी झाडं तोडायची आणि त्यानंतर दोन ते तीन झाडं लावायची. वृक्ष लागवड केल्याचा नंतर पाठपुरावाही होत नाही. झाडं वाचली पाहिजेत हाच प्रयत्न आहे. काळजी करू नका”. सयाजी शिंदे हे गेल्या अनेक वर्षांपासून स्वत: वृक्षारोपणाची जबाबदारी सांभाळत आहेत. सयाजी शिंदे यांनी त्यांच्या सह्याद्री देवराई या संस्थेच्या माध्यमातून अनेक वृक्षांची लागवड केली आहे.