मराठीसह हिंदी व दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदेंच्या प्रकृतीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. ११ एप्रिल ( गुरुवार ) रोजी त्यांच्यावर साताऱ्यात हृदय शस्त्रक्रिया पार पडली आहे. छातीत त्रास जाणवू लागल्यानंतर साताऱ्यातील एका खाजगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होतं.

सयाजी शिंदे रुग्णालयात दाखल केल्यावर डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी व काही चाचण्या केल्या. त्यामध्ये हृदयाच्या एका रक्तवाहिनीत ब्लॉक असल्याचं समजल्यानंतर सयाजी शिंदे यांच्यावर तात्काळ अँजिओप्लास्टी करण्यात आली. सध्या त्यांची प्रकृती व्यवस्थित असून दोन दिवसांत त्यांना डिस्चार्ज दिला जाणार असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

हेही वाचा : अजय देवगण की अक्षय कुमार, कोणाच्या चित्रपटाने केली ग्रँड ओपनिंग? दोन्ही चित्रपटांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन….

अभिनेत्यांवर उपचार करणारे डॉ. सोमनाथ साबळे त्यांच्या प्रकृतीबद्दल म्हणाले, “सयाजी शिंदे यांना गेल्या काही दिवसांपासून छातीत काहीसा त्रास जाणवू लागल्याने त्यांनी माझ्याकडून काही रुटिन तपासण्या करून घेतल्या. त्यांच्या ECG मध्ये मला काही बदल जाणवले. याशिवाय त्यांच्या २-डी एको मध्ये हृदयातील एका छोट्या भागाची हालचाल थोडी कमी असल्याचं जाणवलं होतं. पुढे, त्यांची स्ट्रेस टेस्ट करण्यात आली त्यातही दोष आढळले. यामुळेच त्यांना अँजिओग्राफी करण्याचा सल्ला आम्ही दिला होता.”

हेही वाचा : कंगना रणौतचं राहुल गांधींना आव्हान, “…तर राजकारणच काय, मी हा देश सोडून निघून जाईन”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“अँजिओग्राफी केल्यावर हृदयातील तीन रक्तवाहिन्यांपैकी दोन रक्तवाहिन्या पूर्णपणे नॉर्मल होत्या आणि उजव्या बाजूच्या रक्तवाहिनीमध्ये ९९ टक्के ब्लॉक आम्हाला आढळला. हा ब्लॉक रिस्की असल्याने या ब्लॉकची अँजिओप्लास्टी करण्यास त्यांनी तात्काळ संमती दिली. हृदयविकाराचा झटका येण्याआधी ते फार जागृत होते. त्यांनी सगळ्या गोष्टी सकात्मकतेने हाताळून वेळीच उपचार केले. आता त्यांची प्रकृती स्थिर असून लवकरच त्यांना घरी सोडण्यात येईल. आता त्यांच्या शरीरातील सगळ्या गोष्टी व रिपोर्ट्स स्टेबल आहेत.” अशी माहिती डॉक्टरांनी माध्यमांना दिली आहे.