मराठीमधील सुप्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये सायली संजीवचंही नाव आवर्जुन घेतलं जातं. सायलीचा आज वाढदिवस आहे. पण या वाढदिवसानिमित्त ती तिच्या बाबांना खूप मिस करत आहे. २०२१मध्ये ३० नोव्हेंबरला तिच्या वडिलांचं निधन झालं. सायली तिच्या वडिलांच्या खूप जवळ होती. दोघांचं एकमेकांशी अगदी घट्ट नातं होतं. तिचा क्रश कोण? इतकंच नव्हे तर वडिलांचा क्रश इथपर्यंत या दोघांमध्ये चर्चा रंगायच्या. मध्यंतरी एका मुलाखतीदरम्यान सायलीने जुन्या आठवणींना उजाळा दिला.

आणखी वाचा – वनिता खरातच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात, अभिनेत्रीच्या होणाऱ्या नवऱ्यानेही हातावर काढली मेहेंदी

अभिनेत्री सुलेखा तळवलकर यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये सायली तिच्या बाबांबाबत भरभरून बोलत होती. सुलेखा यांनी तिला तुझ्या बाबांची एखादी आठवण आम्हाला सांग असं म्हटलं. यावर सायलीने त्यांच्या निधनापूर्वीची एक आठवण सांगितली.

सायली म्हणाली, “बाबांबरोबरच्या असंख्य आठवणी आहेत. पण बाबांचं निधन होण्यापूर्वीची मी एक आठवण सांगते. एखाद्याची इच्छाशक्ती किती उत्तम असू शकते हे मला यावरून कळालं. बाबांचा कर्करोग बरा व्हावा म्हणून मी त्यांच्यावर उपचार करत होते. ते लवकरात लवकर बरे व्हावे हीच माझी इच्छा होती.”

आणखी वाचा – Video : आधी ‘गाणी गाऊ नका’, ‘वाईट आवाज’ म्हणत केलं ट्रोल, आता अमृता फडणवीसांच्या त्याच गाण्याला मिळाले लाखो व्ह्यूज

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“त्यांच्यावर उपचार करायचे होते म्हणून मी गाडी घेऊ शकले नाही. कर्करोगाच्या उपचारासाठी सगळे पैसे लागणार होते. मी गाडी खरेदी करू शकले नाही हे बाबांच्या डोक्यात होतं. बाबांचं निधन होण्यापूर्वी त्यांनी पाडव्याला मला गाडी गिफ्ट केली. त्यावेळी त्यांना उठून बसताही येत नव्हतं. तरीही ते उठून बसले. आरटीजीएसच्या पेपरवर त्यांनी साईन केली. सगळे पैसे मला देऊन त्यांनी गाडी घ्यायला लावली. काहीही करून त्यांनी ती गाडी मला गिफ्ट दिली.” आजही वाढदिवसाचा केक कापत असताना बाबांना मिस करत असल्याचं सायलीने सोशल मीडिया अकाऊंटद्वारे पोस्ट शेअर करत म्हटलं.