सायली संजीव ही मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री मानली जाते. आतापर्यंत तिने अनेक वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. तिच्या सहज सुंदर अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. तिचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. अनेक कलाकार २०२२ ला निरोप देत २०२३ चे नवे संकल्प शेअर करताना दिसत आहेत. सायली संजीवही यात मागे नाही.

२०२२ हे वर्ष सायलीसाठी खूप खास ठरलं. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेला पैठणी हा तिचा चित्रपट खूप गाजला. प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिला. तसंच या चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कारावरही आपलं नाव कोरलं. तसंच २०२३ मध्येही सायलीला अनेक उत्तमोत्तम गोष्टी करायच्या आहेत. अभिनयाव्यतिरिक्त सायलीला अनेक छंद आहेत. पण कामामुळे त्यांना वेळ देणं शक्य होत नाही, असं तिने ‘महाराष्ट्र टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

आणखी वाचा : …आणि जिनिलीया देशमुखने मानले सायली संजीवचे हात जोडून आभार, जाणून घ्या नक्की काय झालं

२०२३ च्या प्लॅन्सबद्दल तिला विचारलं गेलं असता ती म्हणाली, “मी मुंबई विद्यापीठातून एम.ए इन पॉलिटिकल सायन्स करत आहे. ते या वर्षात पूर्ण होईल. असंच गेली अनेक वर्ष मला नृत्य आणि बासरी वादन शिकण्याची इच्छा होती. त्यापैकी बासरी वादन शिकायला मी सुरुवात केली आहे, तर नृत्य शिकायला सुरुवात करायला आणखीन थोडा वेळ लागेल.”

हेही वाचा : “कोणालाही कळू न देता मी…” अखेर सायली संजीवने उघड केलं गुपित

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे तिने सांगितलं, “२०२३ चे पहिले सहा महिने तरी मी चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यग्र असेन. फक्त मराठीच नाहीतर अमराठी कलाकृतींमधूनही मी यावर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेली काही वर्ष कामाच्या व्यग्र वेळापत्रकामुळे मला माझी नृत्य आणि बासरी वादन शिकण्याची इच्छा पूर्ण करणं शक्य झालं नाही मात्र यावर्षी माझ्या त्या इच्छा पूर्ण करण्याकडेही मी लक्ष देणार आहे.”