ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर मराठी मनोरंजनसृष्टीतले लोकप्रिय अभिनेते आहेत. मराठीबरोबर हिंदी सिनेसृष्टीत त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. विनोदाचा बादशाह आणि मिमिक्री आर्टिस्ट म्हणून त्यांना ओळखले जाते. नुकत्याच एका मुलाखतीत विजय पाटकर यांनी मराठी इंडस्ट्रीतील नव्या कलाकारांकडून मिळणाऱ्या वागणुकीवर भाष्य केलं आहे.

हेही वाचा- दिग्दर्शक रवी जाधव यांनी खरेदी केली इकोफ्रेंडली आलिशान गाडी, किंमत माहितीये का?

नुकतंच विजय पाटकर, जयवंत वाडकर आणि तुषार दळवी यांनी लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. यावेळी विजय पाटकर यांनी नव्या कलाकारांकडून मिळणाऱ्या वागणुकीवर खंत व्यक्त केली. पाटकर म्हणाले, “व्हॅनिटी व्हॅनमुळे आज सगळ्यांची वाट लागली आहे. आमच्या काळात व्हॅनिटी व्हॅन नव्हती, त्यामुळे आमचं नात आणखी घट्ट झालं. आताच्या कलाकारांना कुणाबरोबरही व्हॅनिटी व्हॅन शेअर करायची नसते. कुणी तिसरा कलाकार त्या व्हॅनमध्ये आला तर लगेच प्रोडक्शन हाऊसला फोन करून त्याला बाहेर काढायला सांगितलं जातं.”

हेही वाचा- प्रार्थना बेहरेच्या ‘या’ दोन इच्छा आजही अपूर्ण; अभिनेत्रीने स्वत: केला खुलासा, म्हणाली….

पाटकर पुढे म्हणाले, “तेजाब चित्रपटाच्या वेळी आमच्यापासून अनिल कपूर आणि जॉनी लिव्हरपर्यंत सगळ्यांनी झाडाखाली कपडे बदलले आहेत. आत्ताच्या कलाकारांमध्ये ती गोष्ट दिसून येत नाही. आजही आम्ही कुठं शूटिंगला गेलो तर सेटवर बाहेर एकत्र जेवायला बसतो, पण आताचे अभिनेता आणि अभिनेत्री आपलं वेगळं जेवण करतात. आताच्या नव्या कलाकारांनी आदर देणं आणि थोडं माणसात येण गरजेचं आहे.”

हेही वाचा-“मोहनचे गुण आणि अनुभव…” शुभांगी गोखलेंनी सांगितलं दुसरं लग्न न करण्यामागचं कारण, म्हणाल्या “सखीमुळे…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विजय पाटकर यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर अभिनयाबरोबरच त्यांनी निर्माता आणि दिग्दर्शक म्हणूनही कामं केलं आहे. अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डेंबरोबर त्यांची जोडी चांगलीच जमली. चित्रपटाबरोबर मराठी नाटक आणि मालिकांमध्येही त्यांनी साकारलेल्या भूमिका चांगल्याच गाजल्या होत्या.