मराठमोळा अभिनेता शशांक केतकर लोकप्रिय अभिनेता आहे. तो सोशल मीडियावर सक्रिय असतो. तो त्याच्या चाहत्यांना फोटो व व्हिडीओ शेअर करत आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल माहिती देत असतो. शशांकचा सातारा येथील वाडा पाडला जाणार आहे. त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करून याबद्दल माहिती दिली आहे. ज्या वाड्यात शशांकचा जन्म झाला, तो वाडा पाडून तिथे मोठी इमारत उभारली जाणार आहे. शशांकने काही फोटो शेअर करून वाड्यातील आठवणींना उजाळा दिला आहे.

हेही वाचा – Video: “गमावलं ना मी तुला”! मराठी अभिनेत्रीचा भीषण अपघात, कारचा झाला चेंदामेंदा, व्हिडीओ शेअर करत म्हणाली

“सातारा. ज्या वाड्यात माझा जन्म झाला तो हा नेने वाडा. खूप आठवणी आहेत या वाड्यातल्या. काही महिन्यात आता हा पाडला जाईल आणि तिथे एका घराऐवजी, अनेक घरांची सात आठ मजली ईमारत उभी राहील. आता हा वाडा फक्त काही फोटोस आणि आठवणीतच शिल्लक राहील,” असं शशांकने फोटोसोबत कॅप्शन लिहिलं आहे.

साताऱ्यातील नेने चौक येथील हा वाडा पाडून तिथे इमारत बांधली जाणार आहे. शशांकने या वाड्यात त्याचा जन्म झाला होता असं सांगितलं. या वाड्यातले काही फोटोही त्याने शेअर केले असून तो वाडा काही महिन्यांनी फक्त आठवणीतच शिल्लक राहील, असं म्हटलंय.

shashank
शशांक केतकरच्या पोस्टवरील कमेंट

दरम्यान, शशांकच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत ‘हा वाडा तू राखायला हवा’, असं म्हटलंय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“या वाड्यात माझ्या सारख्या अनेकांवर लहानपणी संस्कार झाले आहेत. नेने आजींकडे गीतापठण आणि मग लीमलेट ची गोळी आणि आजोबांचा धाक, आदरयुक्त भिती.. अशा अनेक आठवणीदेखील जोडल्या गेलेल्या आहेत या वाड्याशी..” अशी आठवण एका युजरने कमेंटमध्ये सांगितली आहे.