लोकप्रिय मराठी अभिनेत्री शिवानी सुर्वे १ फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकली. शिवानीने अभिनेता अजिंक्य ननावरेबरोबर लग्नगाठ बांधली. शिवानी-अजिंक्यच्या लग्नाला मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. या लग्नातील फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. दरम्यान, दोघे आता एका नव्या व्हिडीओमुळे चर्चेत आले आहेत.

शिवानी व अजिंक्य सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. निरनिराळे फोटो व व्हिडीओ शेअर करीत ते चाहत्यांना अपडेट देत असतात. शिवानी व अजिंक्यच्या लग्नाला नुकताच एक महिना पूर्ण झाला आहे. त्यानिमित्त दोघांनी इन्स्टाग्रामवर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दोघे एका निसर्गरम्य ठिकाणी फिरायला गेल्याचे दिसून येत आहे. तिथे अजिंक्य घोडस्वारी; तर शिवानी गोल्फ खेळ खेळताना दिसत आहे.

A young boy K Ayushmaan Rao dresses up as Ram Lalla
चिमुकला रामलल्ला पाहिला का? रामलल्लांच्या वेषभूषेतील रामभक्ताचा व्हिडीओ होतोय व्हायरल
south east central railway recruitment 2024 Job opportunities in south east central railway
नोकरीची संधी : ‘दक्षिण पूर्व मध्य रेल्वे’मधील संधी
Shocking video 9 year old girl going to school was attacked by a pitbull dog
VIDEO: भयंकर! चिमुकला अंगणात खेळत होता; इतक्यात पिटबुल कुत्रा आला अन्..आधी हल्ला, मग ओढून नेलं
mexico suspends diplomatic relations with ecuador after raid on embassy
मेक्सिको, इक्वेडोरचे राजनैतिक संबंध संपुष्टात; दूतावासातील इक्वेडोरच्या कारवाईनंतर मेक्सिकोचा निर्णय

हेही वाचा-महेश मांजरेकरांना वाटतं ‘हे’ असावं स्वतःच्या जीवनपटाचं नाव, म्हणाले…

हा व्हिडीओ शेअर करीत त्यांनी “तुम्ही मजा करताना वेळ अगदी सहज निघून जातो,” अशी कॅप्शनही दिली आहे. तसेच लग्नाला एक महिना पूर्ण झाल्यानिमित्त एकमेकांना शुभेच्छाही दिल्या आहेत. शिवानी व अजिंक्यचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेक चाहत्यांनी या व्हिडीओवर कमेंट्स करीत दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत.

अनेक दिवसांपासून शिवानी व अजिंक्यच्या नात्याची चर्चा सुरू होती. अखेर दोघांनी ३१ जानेवारीला गुपचूप साखरपुडा उरकत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. शिवानी व अजिंक्यची पहिल्यांदा भेट तू जीवाला गुंतवावे या मालिकेच्या सेटवर झाली. सुरुवातीला त्यांच्यात मैत्री झाली आणि नंतर मैत्रीचे रूपांतर हळूहळू प्रेमात झाले. जवळपास आठ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केले.

हेही वाचा- लग्नानंतर प्रथमेश परबने जोडीने केली सत्यनारायण महापूजा! क्षितिजाने सासरी ‘असा’ केला गृहप्रवेश, पाहा फोटो

शिवानीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, चित्रपट, मालिका, नाटक यांच्या माध्यमातून ती प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आली आहे. मराठीबरोबर हिंदी मालिकेतही तिने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. काही दिवसांपूर्वीच तिचा झिम्मा-२ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. तर, अजिंक्य सध्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहे.