‘झिम्मा २’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाचा पहिला भाग लॉकडाऊननंतर २०२१ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता ‘झिम्मा’च्या सीक्वेलमध्ये सगळ्या अभिनेत्री इंदू डार्लिंगचा वाढदिवस साजरा करण्यासाठी परदेशात जाणार आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर आणि पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या चित्रपटातील “मराठी पोरी दुनियेला दाखवती माज…” या गाण्याने अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे.

‘झिम्मा’च्या “मराठी पोरी” या गाण्यात इंदूच्या ७५ व्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन पाहायला मिळत आहे. तसेच या गाण्याद्वारे चित्रपटातील प्रत्येक स्त्री पात्राच्या स्वभावाची गोष्ट सांगण्यात आली आहे. या गाण्यावर आता सामान्यांपासून ते मराठी कलाविश्वातील कलाकारांपर्यंत सगळेजण व्हिडीओ बनवत आहेत. चित्रपटातील काही कलाकार देखील त्यांच्या खऱ्या आयुष्यातील जोडीदाराबरोबर “मराठी पोरी…” या गाण्यावर थिरकले आहेत.

‘झिम्मा २’मध्ये मनालीचं पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री शिवानी सुर्वेने तिच्या बॉयफ्रेंडसह “मराठी पोरी” या गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. अभिनेत्री खऱ्या आयुष्यात गेली अनेक वर्ष ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ फेम अभिनेता अजिंक्य ननावरेला डेट करत आहे. या दोघांनीही आज दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने हा खास डान्स केला आहे.

हेही वाचा : “मर्सिडीज घ्यायची ना…”, सिद्धार्थ-मितालीची नवीन गाडी पाहून नेटकऱ्याची कमेंट; अभिनेत्री म्हणाली, “बजेट…”

View this post on Instagram

A post shared by Shivani Surve (@iam_shivanisurve)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवानी या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिते, “आज पाडाव्यानिमित्त खास…अजिंक्यबरोबर पहिल्यांदाच डान्स केला” नेटकऱ्यांनी दोघांच्या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. दरम्यान, झिम्मा २ चित्रपट येत्या २४ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात शिवानीसह सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरु आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या मुख्य भूमिका आहेत.