सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांनी दिवाळीच्या मुहूर्तावर त्यांच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. दिवाळी पाडव्याला या जोडप्याने त्यांची पहिली आलिशान गाडी खरेदी केली आहे. दोघांनीही या नव्या गाडीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सध्या या जोडप्यावर सिनेविश्वातून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. हेही वाचा : ‘या’ चिमुकल्यांना ओळखलंत का? सध्या प्रेक्षकांच्या मनावर गाजवतायत अधिराज्य मिताली मयेकरने तिच्या नव्या गाडीबरोबर व्हिडीओ शेअर करत याला "माझी लक्ष्मी आली…" असं कॅप्शन दिलं आहे. यावेळी अभिनेत्रीच्या पारंपरिक लूकने विशेष लक्ष वेधून घेतलं. मराठी सिनेविश्वातील कलाकारमंडळींसह नेटकऱ्यांनी मितालीचं नव्या गाडीसाठी कौतुक केलं आहे. परंतु, सवयीप्रमाणे काही युजर्सनी उलट-सुलट प्रश्न विचारून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. हेही वाचा : श्रेयस तळपदेकडून नव्या चित्रपटाची घोषणा, माजी मुख्यमंत्र्यांची पत्नी झळकणार प्रमुख भूमिकेत https://www.instagram.com/reel/CznQ-sWtk-B/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA== सिद्धार्थ-मितालीने Kia सेल्टोस ही आलिशान गाडी खरेदी केली आहे. त्यामुळे एका नेटकऱ्यांने मितालीला "मर्सिडीज घ्यायची ना…" असं कमेंट सेक्शनमध्ये सांगितलं. यावर अभिनेत्रीने नेटकऱ्याला, "तेवढं बजेट नव्हतं माझं. पुढच्या वर्षी नक्की घेईन." असं उत्तर दिलं. मिताली मयेकर दरम्यान, सिद्धार्थ-मितालीबद्दल सांगायचं झालं, तर एकमेकांना अनेकवर्ष डेट केल्यावर दोघांनीही २०२१ मध्ये लग्नगाठ बांधली. गेल्यावर्षी त्यांनी मुंबईत हक्काचं पहिलं घर घेतलं होतं. दोघांचेही परदेश वारीचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. आता नवीन गाडी घेतल्यामुळे कलाविश्वातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.