Pooja Sawant Birthday: मराठी अभिनेत्री पूजा सावंतचा आज ३४ वा वाढदिवस आहे. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या पूजाला चाहते वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. सोशल मीडियावर तिचे सिनेसृष्टीतील मित्र-मैत्रिणी पोस्ट करून पूजाला शुभेच्छा देत आहेत. अशातच पूजाचा होणारा पती सिद्धेशनेही तिच्यासाठी खास पोस्ट केली आहे.

सिद्धेश चव्हाणने होणारी पत्नी पूजा सावंतसाठी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. याबरोबरच त्याने दोन फोटोही शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये पूजा व सिद्धेश दिसत आहेत, तर एका फोटोत पूजा केक कापताना दिसत आहे. “आजच्या या खास दिवशी, आपलं नातं निर्माण केल्याबद्दल मी देवाचा आभारी आहे. आपल्या नात्यात तू नेहमीच भक्कम आधारस्तंभ राहिली आहेस. तुझा दिवस आणि येणारे वर्ष तुझ्या हास्यासारखे सुंदर जावो. हॅप्पी बर्थडे लव्ह!,” असं कॅप्शन त्याने या फोटोंना दिलंय.

व्हॅलेंटाईन डेला साखरपुडा, तर लग्न…; प्रथमेश परबच्या अनोख्या लग्नपत्रिकेने वेधलं लक्ष

सिद्धेशच्या या पोस्टवर पूजाने कमेंट केली आहे. ‘तू वापरलेले शब्द…खूप खूप धन्यवाद my siddly…आपला नवीन सहप्रवास सुरू करण्यासाठी मला आता आणखी वाट बघवत नाही…एकत्रित आणखी अशाच अनेक सुंदर क्षणांची मी वाट पाहत आहे,’ असं तिने लिहिलंय.

“काही वर्ष…”, लग्नानंतर अभिनेत्री पूजा सावंत ऑस्ट्रेलियात स्थायिक होणार का? म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, पूजा सावंतने नोव्हेंबर महिन्यात फोटो शेअर करत सिद्धेशबरोबर साखरपुडा केल्याची बातमी चाहत्यांना दिली होती. पूजाचा होणारा पती सिद्धार्थ हा मूळचा मुंबईचा असून त्याचे पालक मुंबईतच राहतात. कामानिमित्त सिद्धेश ऑस्ट्रेलियातही राहतो. काही वर्षांसाठी सिद्धेश ऑस्ट्रेलियात असेल, त्यामुळे लग्नानंतर मुंबई आणि ऑस्ट्रेलिया असा प्रवास चालू राहिल, असं पूजाने लोकसत्ताच्या डिजिटल अड्डामध्ये सांगितलं.