मराठी अभिनेता सिद्धार्थ चांदेकर सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. इन्स्टाग्रामवर सिद्धार्थ चांदेकरचा बराच मोठा चाहता वर्ग आहे आणि त्याच्या सोशल मीडियावर अनेकदा त्याच्या पोस्ट व्हायरल होताना दिसतो. सिद्धार्थ चांदेकर सोशल मीडियावर त्याच्या रोजच्या आयुष्याबरोबरच आगामी प्रोजेक्टबद्दल माहिती देत असतो. नुकतीच त्याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. सिद्धार्थची ही पोस्ट बरीच चर्चेत आहे.

सिद्धार्थ चांदेकर मागच्या वर्षी हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा’ या चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट त्यावेळी बराच गाजला आणि बॉक्स ऑफिसवरही चित्रपटाने चांगली कामगिरी केली होती. या चित्रपटात सिद्धार्थने टूर गाइडची भूमिका साकारली होती. बायकांच्या ग्रुपला लंडन फिरवून दाखवणाऱ्या सिद्धार्थच्या भूमिकेचं बरंच कौतुक झालं होतं. या चित्रपटाच्या शूटिंगचे किस्से त्यावेळी सिद्धार्थने सोशल मीडियावर शेअर केले होते. नुकतंच या चित्रपटाच्या प्रदर्शनाला एक वर्ष पूर्ण झालं. त्यानिमित्ताने सिद्धार्थने एक पोस्ट शेअर केली आहे.

आणखी वाचा- “तिकीटं काढल्यानंतर पैसे परत देऊन…” मराठी चित्रपटाचा शो रद्द केल्यानंतर हेमंत ढोमेची संतप्त पोस्ट

‘झिम्मा’ चित्रपटाच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने सिद्धार्थ चांदेकरने सर्व अभिनेत्रींना उद्देशून खास पोस्ट शेअर केली आहे. आपल्या पोस्टमध्ये त्याने म्हटलंय, “मागच्या वर्षी तुम्ही बायकांनी काहीतरी अविस्मरणीय करुन दाखवलं. त्याला एक वर्ष पूर्ण झालंय. खूप प्रेम. आणि खूप आभार. अमेझॉन प्राइम व्हिडीओवर तुमचा दंगा चालू राहू द्या.” सिद्धांतच्या पोस्टवर अनेक युजर्सनी कमेंट्स करत या चित्रपटाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. कमेंट्समध्ये युजर्सनी या चित्रपटाचं खूप कौतुक केलं आहे.

आणखी वाचा- “…म्हणून मी गायक होऊ शकलो नाही,” व्हिडीओ पोस्ट करत सिद्धार्थ चांदेकरने दिलं स्पष्टीकरण

View this post on Instagram

A post shared by Siddharth Seema Chandekar (@sidchandekar)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मराठमोळा दिग्दर्शक हेमंत ढोमेने दिग्दर्शत केलेला ‘झिम्मा’ अमेझॉन प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. या चित्रपटात सिद्धांत चांदेकर, सोनाली कुलकर्णी, निर्मिती सावंत, मृण्मयी गोडबोले, सुचित्रा बांदेकर, सायली संजीव, सुहास जोशी, क्षिती जोग यांच्या मुख्य भूमिका होत्या. लॉकडाऊननंतर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती.