मराठी कलाविश्वातील प्रवीण तरडे, उपेंद्र लिमये, सयाजी शिंदे, श्रृती मराठे, सचिन खेडेकर अशा अनेक कलाकारांनी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या यादीत आता लवकरच मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्रीचं नावं जोडलं जाणार आहे. ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणीही नसून महाराष्ट्राची लाडकी अप्सरा सोनाली कुलकर्णी आहे.

सोनाली कुलकर्णी लवकरच मल्याळम चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोहनलालसह स्क्रीन शेअर करणार आहे. ‘मलाइकोट्टई वालीबान’ या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्री पहिल्यांदाच मल्याळम सिनेसृष्टीत काम करणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोनालीच्या दाक्षिणात्य पदार्पणाची जोरदार चर्चा सुरु होती. अखेर तिने या सिनेमाची पहिली झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे.

हेही वाचा : ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ नाटकाच्या वादावर सौरभ गोखले स्पष्टच बोलला, म्हणाला, “हे दुर्दैवी आहे….”

सुपरस्टार मोहनलाल प्रमुख भूमिका साकारत असलेल्या ‘मलाइकोट्टई वालीबान’ चित्रपटाचा पहिला लूक आणि टीझर सोनालीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. अभिनेत्रीची थेट दक्षिणेत वर्णी लागल्याने तिच्या चाहत्यांनी सोनालीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. जानेवारी २०२३ पासून या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली होती. जानेवारी ते जून २०२३ या ६ महिन्यांच्या कालावधीत सोनालीने या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं.

हेही वाचा : “अमिताभ बच्चन साहेबांनी मला मिठी मारली अन्…”, उपेंद्र लिमयेंनी सांगितला किस्सा; म्हणाले, “तो चित्रपट…”

View this post on Instagram

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढच्या वर्षी २५ जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, सोनालीच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर अभिनेत्री लवकरच मोठ्या पडद्यावर ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ यांच्या भूमिकेत झळकणार आहे. तिने यापूर्वी ऐतिहासिक भूमिका साकारलेल्या ‘हिरकणी’ चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता.