मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत सोनाली कुलकर्णीचे नाव नेहमीच आघाडीवर असते. ती नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असते. ती सोशल मीडियावर कायमच सक्रीय असल्याचे पाहायला मिळते. ती तिच्या आयुष्यात घडणाऱ्या सगळ्या घडामोडी चाहत्यांशी कायम शेअर करत असते. आता आज महिला दिनानिमित्त तिने एक खास पोस्ट केली आहे.

सोनाली सध्या तिच्या आगामी ‘मोगलमर्दिनी ताराराणी’ या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. या चित्रपटात ती मुख्य भूमिका साकारत आहे. या चित्रपटातून बिकट आणि क्लिष्ट परिस्थितीतही ज्यांनी उत्तम व्यवस्थापनाचे उदाहरण स्थापित केले यासोबत एक मुलगी, सून, पत्नी, माता तसेच राजस्त्री या भूमिकांमध्ये देखील आदर्श प्रस्थापित केले अशा अष्टपैलू स्त्रीचे म्हणजेच छत्रपती ताराराणी यांचे जीवन उलगडले जाणार आहे. आता त्यांच्या पराक्रमाबद्दल भाष्य करणारी आणि त्यांना सलाम करणारी एक पोस्ट सोनालीने महिला दिनानिमित्त केली आहे.

आणखी वाचा : Video: मराठ्यांच्या अखंडित लढ्याची कहाणी उलगडणार, ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’चा अंगावर काटा आणणारा टीझर प्रदर्शित

तिने लिहीलं, “भारतीय इतिहासातील दमदार पात्रांपैकी एक असलेल्या या स्त्रीला पोर्तुगीजांनी ‘रैन्हा डोस मराठे’ किंवा ‘मराठ्यांची राणी’ असेही संबोधले होते. महाराणी ताराबाई भोसले या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सून, सरसेनापती हंबीररावांच्या शूर कन्या आणि भारतातील सर्वात महान मध्ययुगीन सम्राटांपैकी एक आहेत. अफाट ताकदीने आणि इच्छाशक्तीच्या जोरावर राज्य वाचवणाऱ्या इतिहासातील मोजक्या महिलांपैकी ताराबाईंच्या अदम्य धाडसाला आणि अदम्य वृत्तीला सलाम करावा लागेल. मराठ्यांचा उदय-अस्त पाहणारी स्त्री.”

हेही वाचा : “आम्ही जिथे जातो तिथे…”; दुबईत दिवाळी साजरी करण्यावरून टोमणे मारणाऱ्यांना सोनाली कुलकर्णीचे सडेतोड उत्तर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे ती म्हणाली, “आपल्या राज्याप्रती अत्यंत समर्पित असलेल्या अदम्य योद्धा महाराणी ताराबाईंनी मराठा महासंघाला अगदी खालच्या पातळीवर असताना विघटित होण्यापासून रोखले नाही तर राष्ट्रीय सत्तेपर्यंत पोहोचण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. या एकट्यानं जगातील सर्वात पराक्रमी शासक औरंगजेबाच्या प्रचंड सैन्याविरुद्ध मराठ्यांचा प्रतिकार केला. मी हा #जागतिकमहिलादिन त्यांना आणि त्यांच्या सारख्या स्त्रियांना समर्पित करते ज्या केवळ स्वतःसाठीच नाही तर आपल्या माणसांसाठी लढतात.” आता सोनालीची ही पोस्ट खूपच चर्चेत आली असून तिचे चाहते यावर कमेंट्स करत ही पोस्ट आवडल्याचं सांगत आहेत.