मालिका, नाटक, चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या लोकप्रिय व आघाडीच्या अभिनेत्री म्हणून सुकन्या मोनेंना ओळखलं जातं. आजवर त्यांनी अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. सुकन्या मोने अभिनय क्षेत्राप्रमाणे सामाजिक बांधिलकी जपण्यात देखील पुढाकार घेतात. त्या सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. सुकन्या यांनी नुकताच शेअर केलेला एक व्हायरल व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

सुकन्या मोनेंनी शेअर केलेला व्हिडीओ सोलापूरच्या सिद्धरामेश्वराच्या यात्रेमधील आहे. हा व्हिडीओ त्यांनी सर्वप्रथम व्हॉट्सअपवर पाहिला. यामध्ये काही लहान मुलं अंगाला रंग फासून रस्त्याच्या कडेला भीक मागत असल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच या व्हायरल व्हिडीओमध्ये “मुलांना भर थंडीत भीक मागायला प्रवृत्त करून त्रास दिला जातोय” असं एक व्यक्ती सांगत आहे.

हेही वाचा : ‘तुझे मेरी कसम’ म्हणत रितेश-जिनिलीया ‘असे’ झाले महाराष्ट्राचे लाडके दादा-वहिनी!

सोलापूरच्या यात्रेतील हा व्हिडीओ शेअर करत “मला एका व्हॉट्सअप ग्रुपवर हा व्हिडीओ आला आणि मी अस्वस्थ झाले. सदर मुले ही आपणा पैकीच कोणाची तरी बेपत्ता झालेली असू शकतात? कुठलेच मायबाप आपल्या मुलामुलींना अशा पद्धतीने पैशांसाठी उघड्याने नाही सोडत, हे सगळे संशयस्पद आहे! कोण याची दखल घेईल का?” असा संतप्त सवाल सुकन्या मोनेंनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा : श्रेयस तळपदे आजारपणानंतर करणार दमदार कमबॅक! पहिल्यांदाच महेश मांजरेकरांसह करणार काम, जाणून घ्या…

View this post on Instagram

A post shared by Sukanya Kulkarni Mone (@sukanyamoneofficial)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सुकन्या मोनेंनी शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी “शासनापर्यंत हा व्हिडीओ पोहोचला पाहिजे”, “हा व्हिडीओ व्हायरल करा या मुलांना न्याय मिळाला पाहिजे”, “या विरोधात कारवाई झाली पाहिजे” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच अन्य काही युजर्सनी याची गंभीर दखल घेण्याची मागणी पोलिसांसह शासनाकडे केली आहे.